Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सीआयडी मालिकेमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीचे हरवलेले दागिने बारा तासात रिकव्हर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सीआयडी मालिकेमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीचे हरवलेले दागिने बारा तासात रिकव्हर

Surajya Digital
Last updated: 2023/02/13 at 5:12 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● वळसंग येथे अंगावर गाडी घालून खुनाचा प्रयत्न; दोघाविरुद्ध गुन्हा□ नागणेवाडी येथे ओपन जिम मधील २ लाखाची लोखंडी साहित्य पळविले

● अर्पिता कपूरने माणुसकी दाखवत गुन्हा दाखल करण्यास दिला नकार

 

सोलापूर : टीव्हीवर गाजत असलेल्या सीआयडी मालिकेमध्ये पोलीस अधिकाऱ्याची भुमिका करणाऱ्या आर्पित कपूर यांच्या पत्नीचे लग्न मंडपातून चोरीस गेलेल्या साडेपाच तोळ्याचे गंठन फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी १२ तासाचे आतमध्ये रिकव्हर केले. CID serial police officer’s wife’s lost jewelery recovered within 12 hours, Arpita Kapoor refused to file a case showing humanity

 

 

या घटनेची हकीकत अशी, मुंबई येथील टीव्ही कलाकार व सीआयडी मालिकेतील सीआयडी आर्पित कपूर व त्याची पत्नी श्रमीका हे त्यांच्या मेव्हण्याच्या लग्नासाठी शुक्रवारी ( १० फेब्रुवारी) सोलापूर येथील वेदा बॅन्केट या मंगलकार्यालयामध्ये आले होते. लग्न लागण्यापूर्वी त्यांचे चोरीस गेलेले गंठन लग्न लागल्यानंतर दीड वाजण्याचे त्यांच्या लक्षात आले.

या संदर्भात त्यांनी मंगलकार्यालयामध्ये नातेवाईकांकडे विचारपूस करून सायंकाळी ५.०० वा.चे सुमारास त्याने फौजदार चावडी पोलीस स्टेशन गाठले. त्यांचेकडे विचारपूस करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील व त्यांचे पथक लगेच तात्काळ मंगल कार्यालयात पोहोचले.

 

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने व तपासाचे चक्रे फिरवून संशयित लोकांकडे तपास केला असता,हेअर ड्रेसींग करण्यासाठी आलेल्या महिलेकडे चोरीस गेलेले सोन्याचे गंठन मिळून आले. हे गंठन श्रमीका यांना परत करण्यात आलेले आहे. या प्रकाराबाबत माणुसकी दाखवत आर्पित कपूर यानी ती महीला ही घटस्पोटीत व तिला चार वर्षांची लहान मुलगी असल्याने तिच्या विरुद्ध तक्रार देण्यास नकार दिला.

 

आर्पित कपूर यांनी आजपर्यंत केलेल्या सीआयडी मालिकेतील भूमिका आणि फौजदार चावडी पोलिसांकडून करण्यात आलेल्या वास्तव कामगिरीबाबत खूप साम्य असल्याचे सांगून त्याबाबत पोलीसांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● वळसंग येथे अंगावर गाडी घालून खुनाचा प्रयत्न; दोघाविरुद्ध गुन्हा

 

सोलापूर – पूर्वीच्या भांडणावरून अंगावर गाडी घालून तसेच गळा दाबून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना वळसंग (ता.दक्षिण सोलापूर) येथील श्रीशैल लॉजजवळ बुधवारी (ता. ८) रात्रीच्या सुमारास घडली.

 

निखिल नीलकंठ बिराजदार (वय २६ रा. कुंभारी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.  त्याने दिलेल्या फिर्यादीवरून वळसंगच्या पोलिसांनी श्रीनिवास गायकवाड आणि राहुल गेजगे (दोघे रा.सेटलमेंट सोलापूर) या दोघांवर खुनाचा प्रयत्न आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

 

निखिल बिराजदार हा बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वळसंग येथील श्रीशैल लॉज जवळ मित्रांसोबत थांबला होता. त्यावेळी दोघांनी त्यांचे त्याच्या अंगावर वाहन घातले. आणि त्याच्या दिशेने तलवार फेकली. त्यानंतर त्याचा गळा दाबून मारहाण केली. अशी नोंद पोलिसात झाली आहे.

 

□ नागणेवाडी येथे ओपन जिम मधील २ लाखाची लोखंडी साहित्य पळविले

सोलापूर – नागणेवाडी (ता. मंगळवेढा) येथील ओपन जिम मधून चोरट्यांनी २ लाख रुपये किमतीचे लोखंडी साहित्य पळविले. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

या संदर्भात नगरपालिकेचे नितेश भाऊ रणखांबे यांनी मंगळवेढा पोलिसात फिर्याद दाखल केली. नागणेवाडी येथील तलावाजवळ क्रीडा विभागाकडून ओपन जिम उघडण्यात आले होते. त्या ठिकाणचे २ लाखाचे साहित्य अनोळखी चोरट्याने पळविले. अशी नोंद मंगळवेढा पोलिसात झाली आहे .

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #ArpitaKapoor #refused #file #case #showing #humanity, #CID #serial #police #officer's #wife's #lost #jewelery #recovered #within #12hours, #अर्पिताकपूर #माणुसकी #दाखवत #गुन्हादाखल #नकार, #सीआयडी #मालिका #पोलीस #अधिकारी #पत्नी #हरवलेले #दागिने #बारातास #रिकव्हर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article साखर पट्ट्यात लागली स्ट्रॉबेरीची गोडी; 45 डिग्री तापमानात बहरली लालचुटुक स्ट्रॉबेरी
Next Article ‘महावितरण’चा शेतकऱ्यांना ‘झटका’; थकबाकीसाठी पूर्वसूचना न देताच रोहित्र बंद; बळिराजा संतप्त

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?