Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ब्रेक मारल्याने ट्रक खाली चेंगरून क्लिनर ठार; होटगीत टमटम उलटून पाच जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

ब्रेक मारल्याने ट्रक खाली चेंगरून क्लिनर ठार; होटगीत टमटम उलटून पाच जखमी

Surajya Digital
Last updated: 2022/05/24 at 9:04 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ होटगी जवळ टमटम उलटून चालकासह ५ प्रवासी जखमीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ बसमध्ये चढताना सोन्याचे गंठण लंपास

सोलापूर – ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे शेजारी बसलेला क्लिनर खाली कोसळून ट्रकच्या चाकाखाली चेंगरून जागीच ठार झाला. हा अपघात पुणे महामार्गावरील वरवडे (ता.माढा) येथे सोमवारी (ता. 23) पहाटेच्या सुमारास घडला. Hitting the brakes, knocking the truck down and killing the cleaner; Five injured in hotgi overturning in Solapur

धोंडीबा विश्वनाथ मलाले (वय २५ रा. बसवकल्याण जि.बिदर) असे मयत झालेल्या क्लीनरचे नाव आहे. या प्रकरणात ट्रकचा चालक महादेव जयप्रकाश ठमके (रा.बसवकल्याण) याच्याविरुद्ध टेंभुर्णीच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हे दोघेजण ट्रक मधून प्रवास करीत होते.

वरवडे गावाजवळ ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे धोंडीबा मलाले खाली कोसळला. ट्रक तसाच पुढे गेल्याने तो चाकाखाली सापडून मयत झाला. अशी नोंद टेंभुर्णी पोलिसात झाली. सहाय्यक फौजदार गुटाळ पुढील तपास हे करीत आहेत.

□ होटगी जवळ टमटम उलटून चालकासह ५ प्रवासी जखमी

सोलापूर – होटगी रोडवरील साईबाबा मंदिराजवळ वेगाने जाणारी रिक्षा उलटल्याने चालकासह ५ प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज मंगळवारी (ता. 24) सकाळच्या सुमारास घडला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

सरोजा बळगानुरे (वय १८) रेणुका सोलापुरे (वय १९) अर्चना पांडुरंग (सर्व रा.यत्नाळ ता.दक्षिण सोलापूर) सुहाब जमखंडी (वय २४ रा.कुंभारी घरकुल) आणि रिक्षाचा चालक सुरेश कोळी (वय ५० रा.होटगी रोड) असे ५ जण जखमी झाले. ते सर्वजण आज सकाळी एमएच१३-जी-४८६५ या सहा आसनी रिक्षातून हत्तुरेवस्ती ते होटगी असा प्रवास करीत होते. त्यावेळी हा अपघात घडला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

□ बसमध्ये चढताना सोन्याचे गंठण लंपास

सोलापूर : बसमध्ये चढत असताना पर्समधून सोन्याचे मिनी गंठण चोरून नेल्याची घटना काल सोमवारी (दि.२३ मे ) सोलापूर बस स्थानकामध्ये घडली. याप्रकरणी सरोजा शरणाप्पा बिराजदार (वय-५० रा. मुक्काम पोस्ट मुळेगाव,तालुका दक्षिण सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी व फिर्यादीचे पती असे दोघे मिळून उमरगा ठाणे या बसमध्ये चढत होते. त्यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या पर्समधून २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक पोळ हे करीत आहेत.

 

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Hitting #brakes #knocking #truck #killing #cleaner #Five #injured #hotgi #overturning #Solapur, #सोलापूर #ब्रेक #ट्रक #चेंगरून #क्लिनर #ठार #होटगी #टमटम #उलटून #पाच #जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Union Minister Danve केंद्रीयमंत्री दानवे फडणवीसांसाठी गर्दीतून झेंड्याच्या काठीने रस्ता काढतात
Next Article शेळगीत सिक्युरिटी गार्डने केली आत्महत्या; पुण्यातील बाप – लेकाने केली 29 लाखांची फसवणूक

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?