Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वैरागमध्ये रेल्वेतून डिझेल चोरीचा गुन्हा, टेम्पो एसटीला धडकून क्लीनर ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

वैरागमध्ये रेल्वेतून डिझेल चोरीचा गुन्हा, टेम्पो एसटीला धडकून क्लीनर ठार

Surajya Digital
Last updated: 2022/05/11 at 5:50 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

बार्शी : रेल्वेतून चोरलेले डिझेल विकून उरलेले जमिनीवर ओतून उस्मानाबाद येथे टँकर धुण्यासाठी घेवून जात असताना वैराग – उस्मानाबाद रोडवर रातंजन शिवारात संशयास्पदरीत्या  आढळलेल्या टँकर चालकाच्या चौकशीत डिझेल चोरीचा  गुन्हा उघडकीस आला. Diesel theft from train in Vairag, cleaner killed after hitting Tempo ST

वैराग पोलीसांनी चालकास ताब्यात घेऊन या प्रकरणाची फाईल रेल्वे प्रशासनाकडे वर्ग केल्याची माहिती वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी दिली. सदर घटना आठ मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वैराग – उस्मानाबाद रोडवर रातंजन शिवारात घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, ८ मे रोजी  वैराग पोलिसांचे पथक  वैराग – उस्मानाबाद रोडवर पेट्रोलिंग करीत असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास  रांतजन फॉरेस्ट परिसरात एक टॅकर संशयास्पदरीत्या उभा होता. टँकरजवळ जाऊन पाहणी केली असता टँकर चालक किरण मारुती ननवरे (रा . बिबिदारफळ ता . उत्तर सोलापूर) हा टँकरमधील डिझेल जमीवर ओतताना आढळला. त्याचेकडे चौकशी केली असता सुरुवातीस त्याने उडवा उडवीची उत्तरे  दिली.

नंतर त्याने सांगितले की,  ता . 7 मे रोजी रात्री मोहोळ येथे आष्टी रोडवर रेल्वे डिझेल टँकर घेवून जाताना रेल्वे कॉसींगसाठी थांबली होती. रेल्वे चढावर आणि टँकर खड्ड्यात असल्याने पाकणी येथील काही लोक रेल्वेच्या टँकरवर चढले आणि झाकण तोडून पाईप टाकून डिझेल टँकरमध्ये घेतले. त्यातील बरेचसे डिझेल मालकाने विकले असून उरलेले डिझेल जमिनीवर ओतून उस्मानाबाद येथे टँकर धुण्यासाठी घेवून चाललो होतो. सदर टँकरचा मालक देखील बिबिदारफळ येथील असल्याचे चालकाने सांगितले.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

पोलीसांनी टँकरची पाहणी केली असता  टॅकरवर इंडीयन  ऑईल अथवा  हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा  लोगो नव्हता. चालकाजवळ टँकरची कागदपत्रे , डिझेल खरेदीची कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे  टँकर पोलिस ठाण्यात  आणला.

सदर बाब पुरवठा विभागास तसेच पेट्रोलीयम कंपन्या यांच्याशी पत्रव्यवहार करून माहिती घेवून चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी सांगितले.

□ ब्रेक फेल झालेला टेम्पो एसटीला धडकून क्लीनर ठार

सोलापूर – ब्रेक फेल झालेला आयशर टेम्पो समोरून येणाऱ्या एसटीवर धडकल्याने टेम्पोचा क्लिनर गंभीर जखमी होऊन मरण पावला. हा अपघात कन्हेरवाडी ते येरमाळा (जि.उस्मानाबाद) येथील पानगाव जवळ मंगळवारी (ता. 10) दुपारच्या सुमारास घडला.

प्रदीप आशोक घोंगडे (वय २१ रा. कन्हेरवाडी जि.उस्मानाबाद) असे मयत झालेल्या क्लिनरचे नाव आहे. मंगळवारी दुपारी तो आयशर टेम्पोतून येरमाळा येथे जात होता. परतापुर ते पानगाव रस्त्यावर अचानक टेम्पोचे ब्रेक निकामी झाले. आणि टेम्पो समोरील एमएच २०- बीएल -२५९० या एसटीला धडकला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उस्मानाबाद येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला. या अपघाताची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे .

■ खानापूर येथे भावावर तलवारीने हल्ला

खानापूर (ता.अक्कलकोट) येथे माझ्या घरात का आला असे म्हणून तलवारीने तोंडावर मारल्याने सोमनाथ गणपती शिपाई (वय ५५) हा जखमी झाला. ही घटना सोमवारी (ता. 9) रात्रीच्या सुमारास घडली. त्याला तडवळ येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा भाऊ चिदानंद शिपाई याने मारहाण केली, अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #Diesel #theft #train #Vairag #cleaner #killed #hitting #Tempo #ST, #वैराग #रेल्वे #डिझेल #चोरी #गुन्हा #टेम्पो #एसटी #धडकून #क्लीनर #ठार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; तर पळवून नेलेल्या मुलीवर अत्याचार
Next Article सोलापूर : तिल्हेहाळमध्ये आईसह दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?