Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता

admin
Last updated: 2025/05/08 at 6:36 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अहिल्यानगर दि. 8 मे (हिं.स.) :- महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून व पाठपुराव्यातून संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हायटेक बस स्थानक उभे आहे. या बसस्थानकात सर्व अत्याधुनिक सुविधा असून महाराष्ट्रातील आदर्शवत असलेल्या या बसस्थानकाची स्वच्छता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणे च्या मदतीने केल्याने हा परिसर स्वच्छ झाला आहे.

संगमनेर बस स्थानक हे शहरातील मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण आहे. प्रवाशांची या ठिकाणी सातत्याने मोठी वर्दळ असते. या सर्व प्रवाशांना चांगली सुविधा व्हावा याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत अत्याधु निक बस स्थानक निर्माण केले आहे.हे बस स्थानक म्हणजे संगमनेर एअरपोर्ट असा याचा अभिमानाने सर्वजण उल्लेख करतात.सर्व सुविधा,त्याचप्रमाणे शॉपिंग कॉम्प्लेक्स अस ल्याने बस स्थानक परिसरात तालुक्यातून व शहरातून आलेल्या नागरिकांचा मोठा वावर असतो.बस स्थानकाचा परिसर मोठा असल्याने नागरिकांच्या वरदळी मधून या ठिकाणी अस्वच्छता निर्माण होते. येणाऱ्या सर्व प्रवाशांना प्रसन्न वातावरण मिळावे याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या फायर उपलब्ध करून देण्यात आले.

या माध्यमातून सर्व बस स्थानक परिसर धुवून स्वच्छ करण्यात आला. प्रवाशांसाठी अत्यंत प्रसन्न व स्वच्छ वातावरण या ठिकाणी निर्माण झाले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखा न्याने कायम तालुक्याच्या व शहराच्या विविध कामांमध्ये मोठी मदत केली आहे.कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या फायर फायटर मधून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला असून या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याने सर्व प्रवासी व नागरिकांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे यशोधन जनसंपर्क कार्यालय यांचे अभिनंदन केले आहे.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
Next Article चंद्रकांत पाटील यांनी ‍नवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?