Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खडी क्रशरच्या विरोधातील तक्रारी मिटविण्यासाठी खंडणी घेतलेल्या मुख्य आरोपीस अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

खडी क्रशरच्या विरोधातील तक्रारी मिटविण्यासाठी खंडणी घेतलेल्या मुख्य आरोपीस अटक

Surajya Digital
Last updated: 2022/02/14 at 4:03 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

बार्शी : खडी क्रशरच्या विरोधातील तक्रारी मिटविण्यासाठी 5 लाखांची खंडणी मागून 50 हजार रुपये जबरदस्तीने घेतल्या प्रकरणातील मुख्य आरोपी समाधान नागनाथ तिरेकर (रा. इसबावी ता. पंढरपूर) यास तालुका पोलिसांनी अटक केली.

त्यास रविवारी न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.  याप्रकरणी पुढील तपास स.पो.नि. शिवाजी जायपत्रे करीत आहेत. उद्योजक सुनील राधेशाम भराडीया यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन समाधान व त्याच्या साथीदारांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सुनील भराडीया यांचा मुलगा राघव याचे बार्शी शहरालगत असलेल्या ताडसौंदणे गावाच्या हद्दीत परवानाप्राप्त खडी क्रशर आहे. 15 दिवसांपूर्वी आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी खडी क्रशरचा त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यावर भराडीया यांनी उपाययोजना केल्यानंतर तक्रार मागे घेतली गेली होती. Arrest of main accused for taking ransom to clear complaints against stone crusher

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=KPDIOZ3LfVI[/embedyt]

शुक्रवारी दुपारी त्यांना बार्शीतून समाधान बोलतो, असे सांगत फोनवर तुझं क्रशर बेकायदेशीर आहे. तुझ्याविरुध्द शेतकर्‍यांनी तहसीलदारकडे तक्रार दिली आहे. माझ्या मागे पत्रकार आहेत. तुझे क्रशर बंद कर, अशी धमकी दिली गेली. त्यावर त्यांनी माझं क्रशर कायदेशीर आहे. माझ्याकडे सर्व परवानग्या आहेत. तुम्ही या तुम्हाला दाखवितो, असे उत्तर दिले. संध्याकाळी पुन्हा त्यांना त्या व्यक्तीचा फोन आला आणि माझं व पत्रकार लोकांचं सगळ्याचं मिटवावं लागेल, तू आज नाही भेटला तर तू उद्याचा दिवस बघत नाही, अशी धमकी दिली गेली. त्यावर त्यांनी खडी क्रशरवर या, समक्ष बोलू असे सांगितले.

रात्री 10.30 च्या सुमारास ते खडी क्रशरवर आपला मित्र शहाजी वाळके व मुलगा राघव आणि त्याचा मित्र सचिन जाधव यांच्यासमवेत बसलेले असताना दोघेजण आले. त्यापैकी एकाने तुझं खडी क्रशरचं प्रकरण मिटवायचं असेल तर 5 लाख रु. द्यावे लागतील. असं म्हटल्यानंतर त्यांनी माझं क्रशर रितसर आहे, असे सांगितलं.

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=qzRYBUwZ6kg[/embedyt]

त्यावर त्याने टेबलावरील सामान फेकून दिलं. त्यामुळे त्यांच्यात धक्काबुक्की झाली. त्या व्यक्तीने तू मिटवतो म्हणला होता. पैसे दे अशी खंडणी मागितली. त्यावर त्यांनी ड्रावर मधून 50 हजार रुपये काढून त्यास दिले. त्याने दर महिन्याला मला 50 हजार रुपये द्यायचे, असं धमकावले आणि तो निघून गेला. भराडीया यांनी या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #Arrest #mainaccused #taking #ransom #complaints #stone #crusher, #खडीक्रशर #तक्रारी #खंडणी #मुख्यआरोपी #अटक #बार्शी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा; 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार
Next Article भारताकडून आणखी ५४ ॲप्सवर बंदी; आतापर्यंत २२४ ॲप्सवर बंदी

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?