Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नियमांचे काटेकोर पालन करून नाट्यप्रयोग करा; मराठी रंगभूमी दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली परवानगी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

नियमांचे काटेकोर पालन करून नाट्यप्रयोग करा; मराठी रंगभूमी दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली परवानगी

Surajya Digital
Last updated: 2020/11/05 at 8:56 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : नाटकांसाठी आता सरकारने तिसरी घंटा वाजविली आहे, मात्र कोरोनाची भीती अद्याप गेलेली नाही हे लक्षात घेऊन निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नाट्यप्रयोग करा व कलाकार तसेच प्रेक्षकांची काळजी घ्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठी रंगभूमीदिनानिमित्त आज गुरुवारी त्यांनी नाट्य निर्माते, कलाकार यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव विजय सौरव, हे देखील सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, कोरोना नंतरच्या काळात निर्मात्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या विविध मागण्या येत आहेत. नाट्यगृहांच्या भाड्याच्या बाबतीत आपल्या मागणीवर शासन नक्की विचार करेल. मराठी पाऊल पडते पुढे असे आपण म्हणतो पण आता पुढील काळात ते अत्यंत खबरदारीने टाकणे गरजेचे आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी लंडन आणि युरोपमध्ये कोरोनाचे संकट परत वाढले आहे, याची जाणीव करून दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

चित्रपट आणि थिएटर यात फरक हा आहे की इथे रिटेक नाही. त्यामुळे अधिक दक्षता घेणे आले. प्रत्येक निर्मात्याने कलाकारांचे चेकअप करणे, स्टेजवर मास्क काढावा लागला तरी कलाकारांनी अंतर किती ठेवायचे, स्वच्छता कशी ठेवायची हे ठरवावे. थिएटरमध्ये सुद्धा ‘नो मास्क नो एन्ट्री’ असे असले पाहिजे. नाट्यगृहाबाहेरील खाण्याचे स्टॉल्स देखील नियम पाळतात की नाही हे पाहिले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व काही बंद करणे मला मुख्यमंत्री म्हणून यातनादायी आहे हे समजून घ्या.

यावेळी बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले की, बऱ्याच कालावधी नंतर आपण नाट्यगृहे उघडतो आहोत. अनेक छोट्या मोठ्या समस्या येतील. आपण सर्वांनी बरोबर राहून यातून मार्ग काढू, असे आश्वासन दिले.

यावेळी आदेश बांदेकर, सुबोध भावे, मंजिरी भावे, अमेय खोपकर, प्रदीप कबरे, बिभीषण चावरे, डॉ गणेश चंदनशिवे, प्रदीप वैद्य, प्रसाद कांबळी यांनी चर्चेत सहभाग घेऊन काही सूचनाही केल्या.

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

TAGGED: #मुख्यमंत्री #नाट्यकर्मींशी #साधलासंवाद #रंगभूमीदिनी #नाट्यप्रयोगाला #परवानगी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिवसेनेच्या ‘या’ खासदाराला अटक करुन अन्वय नाईक कुटुंबियांसारखा न्याय देण्याची मागणी
Next Article मारुती चितमपल्ली यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार जाहीर; इतर जणांचाही पुरस्कार जाहीर

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?