कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या लहान भावाचे निधन झाले आहे. असिम बॅनर्जी असं त्यांचं नाव आहे. असिम बॅनर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याने कोलकाताच्या मेडिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. कोविड प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील, असं कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं आहे.
West Bengal Chief Minister Mamata Banerjee's younger brother Ashim Banerjee passed away today at the hospital. He had tested positive for #COVID19 and was undergoing treatment: Dr Alok Roy, Chairman, Medica Superspecialty Hospital, Kolkata
— ANI (@ANI) May 15, 2021
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या लहान भावाचं कोरोनामुळे निधन झालं आहे. असीम बॅनर्जी यांच्यावर गेल्या महिनाभरापासून उपचार सुरु होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज सकाळी त्यांनी कोलकातातील मेडिका सुपरस्पेशालिटी रुग्णालयात अंतिम श्वास घेतला. असीम बॅनर्जी यांच्यावर कोरोनाविषयक नियमांनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सलमान खानवर एवढी वाईट वेळ आली… https://t.co/qwjqgBrcc9
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा छोटा भाऊ असीम बॅनर्जी यांचं आज सकाळी रुग्णालयात निधन झालं आहे. ते कोरोनाबाधित होते.’, असं मेडिका रुग्णालयाचे चेअरमन डॉ. अलोक रॉय यांनी सांगितलं आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भावाचे कोरोनाने निधन झाले आहे.