Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विरोधी पक्षाकडून शुभेच्छा; माञ स्टिअरिंग मुख्यमंञ्याच्या हातात असले तरी दिशा मागे बसलेले ठरवतात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

विरोधी पक्षाकडून शुभेच्छा; माञ स्टिअरिंग मुख्यमंञ्याच्या हातात असले तरी दिशा मागे बसलेले ठरवतात

Surajya Digital
Last updated: 2020/07/27 at 3:26 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : ऑटोरिक्षाचं स्टिअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे, पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

“उद्धव ठाकरे यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो, त्यांना आई भवानी दीर्घायुष्य देवो” अशा शुभेच्छा देत फडणवीसांनी भाषणाला सुरुवात केली.  महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते.

(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही https://t.me/Surajyadigital उपलब्ध)

“आम्हाला सरकार पाडण्यात इंटरेस्ट नाही, पण किमान सरकार चालवून तर दाखवा. तुम्ही एकमेकांच्या तंगड्या तोडायला सक्षम आहात. हे जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही, हे धोक्याने आलेलं सरकार आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली आहे. तुमची जर दिशा चुकत असेल तर ते समोर आणणे आमचं काम आहे” असेही फडणवीस म्हणाले.

“कोरोना टेस्टिंग वाढवा आम्ही सांगत आहोत, मात्र आमचे मुख्यमंत्री सांगतात आम्ही सर्वात जास्त टेस्टिंग करत आहोत, पण महाराष्ट्र्र याबाबत 19 व्या क्रमांकावर आहे. मुंबईत टेस्ट होत नाहीत, कारण त्यावर निर्बंध घातले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत लक्ष घातल्यानंतर मृत्यूदर कमी झाला आहे. सेकंड वेव्ह आली नाही, तर एका महिन्यात मुंबईत परिस्थिती आटोक्यात येऊ शकते” असा दावाही फडणवीसांनी केला.

हे सरकार पुण्यावर लक्ष देत नाही, पिंपरी चिंचवडला मदत देत नाही. तुम्ही जर मदत केली नाही तर लोकांना खूप अडचण आहे. आम्ही सरकारच्या सोबत आहोत मात्र ही लपवालपवी थांबवा, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी दिली.

“काही झालं तर केंद्राकडे बोट दाखवायचं आणि केंद्राने पैसे दिले तर त्याचा वापर करायचा नाही. हे जे थोबाड फोडून बोलत होते की पीएम केअरचा पैसे नाही, मात्र आता आरटीआयमधून ही माहिती समोर आलीय” असेही फडणवीस म्हणाले.

You Might Also Like

शरद पवार गट एका विचारधारेवर चालणारा पक्ष – प्रा. डॉ.हेमंत देशमुख

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

TAGGED: #मुख्यमंञी #शुभेच्छा #स्टिअरिंग #दिशा #कुठेजायचं
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सिमेवरील सैनिकांसाठी पुणेकरांनी पाठविले राखीचे ‘प्रेमबंधन’; दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात झाला कार्यक्रम
Next Article भाजपाने केला मोठा संकल्प; महाराष्ट्रात नेते लागले आजपासून कामाला

Latest News

टाटा मेमोरियलमध्ये कर्करोगावरील भारतातील पहिल्या हाय डोस एमआयबीजी थेरपीचा यशस्वी प्रयोग
महाराष्ट्र June 28, 2025
परिपूर्ण शाहू जन्मस्थळाचे लोकार्पण लवकरच – ॲड. आशिष शेलार
महाराष्ट्र June 28, 2025
भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण, पुढील आठवड्यात घोषणा
महाराष्ट्र June 28, 2025
शरद पवार गट एका विचारधारेवर चालणारा पक्ष – प्रा. डॉ.हेमंत देशमुख
राजकारण June 28, 2025
पालकमंत्र्यांच्या हस्ते 12 भूमिहीन लाभार्थ्यांना शेतजमिनीचे वाटप
महाराष्ट्र June 28, 2025
जनवाद कार्यक्रम विविध विषयांचे निवेदन प्राप्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला नागरिकांशी संवाद साधला
महाराष्ट्र June 28, 2025
मुंबई-रेवा विशेष गाड्यांच्या २६ सेवा वाढवल्या
महाराष्ट्र June 28, 2025
तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली
देश - विदेश June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?