Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुख्यमंत्र्यांनी दिल्ली वाऱ्या करत महाराष्ट्राचा स्वाभीमान गहाण ठेवला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

मुख्यमंत्र्यांनी दिल्ली वाऱ्या करत महाराष्ट्राचा स्वाभीमान गहाण ठेवला

Surajya Digital
Last updated: 2022/09/22 at 9:31 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
□ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची सोलापुरात टीकास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ राज ठाकरे म्हणजे बिनबुडाचे भांडे□ मोदी पाकिस्तानला जातात, दाऊदला आणून दाखवावे□ बारामतीत मोदींनी विजयी होऊन दाखवावे

□ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची सोलापुरात टीका

 

The Chief Minister has tarnished Maharashtra’s self-respect by blowing up Delhi Criticism of NCP Women’s Regional President Vidya Chavan in Solapur

सोलापूर : मुख्यमंत्री दिल्ली समोर झुकू लागले, दुर्दैव आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र कधीही दिल्ली समोर झुकला नाही. औरंगजेब असो किंवा कोणत्याही कठीण प्रसंग असो महाराष्ट्राचा बाणा दिल्ली समोर झुकला नाही. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली पुढे झुकतात, मुजरे करायला जातात हे राज्यासाठी दुर्दैवाची बाब आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य गुजरातच्या दावणीला बांधला असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण बुधवारी (ता. 21) सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी चव्हाण यांनी राज्यशासन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज ठाकरे आणि केंद्रशासनावर टीका करत चौफेर फटकेबाजी केली.

सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहात आमच्या सरकारच्या काळात साजरा करण्यात आले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. मात्र मागील दोन वर्षी कोरोना होता. त्यामुळे सर्वत्र निर्बंध होते. सण उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने झाले.  देवेंद्र फडणवीस यांची स्मृतिभ्रंश झाली आहे. त्यांना आम्ही अभ्यासू समजत होते. पण फडणवीसांनी स्मृतीभ्रांशमध्ये अडकून न राहता महागाई कमी करून दाखवावी, महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरात मध्ये गेला, तुम्ही काय केलं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे गुजरात, गुजरात करत महाराष्ट्र विकायला निघाले आहेत खोटा अपप्रचार करण्याऐवजी राजीनामे देऊन घरात बसा अशी खरमरीत टीका चव्हाण यांनी यावेळी केली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. राष्ट्रवादीच्या महिला जास्तीत जास्त कशाप्रकारे निवडून येतील, पक्षाला चांगला उमेदवार देता येईल यासह विविध बाबीवर चर्चा करण्यात आली, असेही राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाचे ढोंगी हिंदुत्व रोखायचे असेल तर सर्व पक्षांनी एकत्रित आले पाहिजे, धर्माच्या नावाने राजकारण करण्यात येत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये सर्व पक्ष जर एकत्रित आले तर भाजपला रोखण्यास यश मिळणार आहे. त्यामुळे सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन चव्हाण यांनी यावेळेस केले.

यावेळी शहराध्यक्ष सुनीता रोटे, ज्योत्स्ना पाटील, लता ढेरे, संगीता पवार, माजी महापौर नलिनी चंदिले, वहिदास शेख, तसलीमा शेख, वंदना भिसे, अश्विनी भोसले, मनीषा नलावडे आदी उपस्थित होते.

□ राज ठाकरे म्हणजे बिनबुडाचे भांडे

मनसे प्रमुख राज ठाकरे हे रोज आपली भूमिका बदलतात. मराठी मुद्द्यासाठी युपी, बिहारच्या कामगारांना मारहाण करता. मग फॉक्स्वानचा प्रकल्प महाराष्ट्रातील वेदांत फॉक्स्वानचा गुजरातला गेला आपण काय केले हिम्मत असेल गुजरात मधील प्रकल्प महाराष्ट्रात मध्ये आणून दाखवा, असे आव्हान राज ठाकरे यांना करत राज ठाकरे म्हणजे बिनबुडाचे भांडे असल्याची टीका केली.

□ मोदी पाकिस्तानला जातात, दाऊदला आणून दाखवावे

 

भाजपच्या विरोधात जे बोलतात त्याला ईडी, सीबीआय लावून अटक केली जाते. नवाब मलिक यांनाही दाऊद कनेक्शन म्हणून आरोपी केले. दाऊदला आणू असे म्हणतात पण त्याचा नवीन फोटो पण आणत नाहीत. सध्या दाऊत कसा दिसतो काळा की गोरा आहे हे माहीत नाही. देशाचे पंतप्रधान पाकिस्तानला जातात, दाऊदला भारतात का आणत नाहीत, असा सवाल करीत टोला देखील त्यांनी मोदीला लगावला.

□ बारामतीत मोदींनी विजयी होऊन दाखवावे

 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती मध्ये अतिशय चांगले काम केले आहे. निर्मला सीतारमण असो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असो बारामतीत निवडणुकीसाठी उभारल्यास त्यांचाच पराभव होईल. निर्मला सीतारमण यांनी आधी देशाचा जीडीपीत सुधारणा करून दाखवावी, असे चॅलेंज त्यांनी यावेळी दिले.

 

 

You Might Also Like

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण

उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन

केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी

‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा

हिमाचल प्रदेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; ४४ प्रवासी जखमी

TAGGED: #ChiefMinister #tarnished #Maharashtra's #self-respect #byblowingup #Delhi, #Criticism #NCP #Women's #Regional #President #VidyaChavan #Solapur, #मुख्यमंत्री #दिल्ली #वाऱ्या #महाराष्ट्र #स्वाभीमान #घाण #राष्ट्रवादीकाँग्रेस #प्रदेशाध्यक्ष #विद्याचव्हाण #सोलापूर #टीका
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ऑनलाइन ओळखीतून प्रेमात रूपांतर झालेल्या अल्पवयीन मुलाने दबावाखाली घेतली फाशी
Next Article महापालिका परिवहन उपक्रमातील दीर्घकाळ गैरहजर असणाऱ्या 21 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई !

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?