सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची पाहणी करण्यासाठी पोहचले आहेत, सांगवी खुर्दच्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद साधला, यावेळी तुम्ही एकटे नाही, सरकार तुमच्या पाठिशी आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ग्रामस्थांना दिलासा दिला आहे.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे, तुम्ही एकटे नाही, कोणीही वाऱ्यावर पडलं नाही, आपलं सरकार हे तुमचं सरकार आहे, तुमच्या पाठिशी आहे, तुम्हाला धीर द्यायला आलो आहे, काळजी करू नका, नुकसान भरपाई देऊ पण कोणाचेही जीव जाऊ देऊ नका.

‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…फेसबुक पेज, टेलिग्राम, ट्वीटर आणि शेअरचॅटवरही उपलब्ध
सावध राहा, किती नुकसान झालंय याचे पंचनामे सुरु आहे, माहिती गोळा केली जात आहे पण माहिती गोळा करून त्याचा अभ्यास करत बसणार नाही, हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, लवकरच मदत जाहीर करू असं त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं आहे.
तसेच विरोधी पक्षाने राजकारण करू नये, राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही, आपत्ती काळात केंद्र आणि राज्य असं काही करू नये, केंद्राकडून राज्याला जे देणं आहे असेल ते केंद्र सरकारने द्यावे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्याआधीच वाद निर्माण झाला होता, सांगवी खुर्दच्या ग्रामस्थांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बोरी नदीच्या पुलावर या असे सांगितले गेले, पण, पुलावरुन नुकसान भरपाईची पाहणी करणार कसं? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित करत मुख्यमंत्री गावात आले तर ठीक, नाहीतर आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती, मात्र सुरक्षेचे कारण देत प्रशासनाने गावकऱ्यांची समजूत काढली त्यानंतर काही गावकऱ्यांना रस्त्यावर बोलवण्यात आले, या लोकांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला.
सोलापूर विमानतळावरून ते शासकीय विश्रामगृह येथे काही काळ थांबणार होते. त्यानंतर ते अक्कलकोटला जाणार होते, मात्र सोलापूर विमानतळावर त्यांचे अर्धा तास उशिराने आगमन झाल्याने त्यांच्या दौऱ्यात अचानक बदल करण्यात आला आणि त्यांनी विमानतळावरून थेट अक्कलकोटला जाणे पसंत केले.

* येणं आलं तर हात पसरावं लागणार नाही – मुख्यमंत्री
केंद्राकडे राज्याचं देणं बाकी आहे. ती मदत आली तर मदतीची गरज पडणार नाही. येणं आलं तर हात पसरावं लागणार नाही. विरोधकांनी त्यावर राजकारण करत बसू नये. शेतकऱ्यांसाठी जे जे करावं लागेल ते करू. दोन-चार दिवस दौरे करणार आहे. माहिती घेत आहे. त्यानंतर शक्य तेवढी मदत करू. हे तुमचं सरकार. शेतकऱ्यांचं सरकार , वाऱ्यावर सोडणार नसल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
