Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सगळी जबाबदारी केंद्राची; मग तुम्ही काय करणार, टीका केल्यावर मुख्यमंत्री पडले बाहेर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

सगळी जबाबदारी केंद्राची; मग तुम्ही काय करणार, टीका केल्यावर मुख्यमंत्री पडले बाहेर

Surajya Digital
Last updated: 2020/10/19 at 1:00 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सगळी जबाबदारी केंद्र सरकारकडे, मग तुम्ही काय करणार? असा खोचक सवाल पाटील यांनी केला आहे. तसेच मदत करण्याची पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे स्पष्ट करत तातडीने ती राज्य सरकारने जाहीर करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांकडून नुकसान भरपाईच्या बाबतीत केंद्राकडे बोट दाखवलं जातंय. यावरून चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं. मदत करण्याची पहिली जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडे मदत मागितली पाहिजे,असे मत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…फेसबुक पेज, टेलिग्राम, ट्वीटर आणि शेअरचॅटवरही उपलब्ध

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना गेल्यावर्षी राष्ट्रपती राजवट लागू असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदतीची मागणी केली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे यांनी ती मदत जाहीर करावी. कशाला पंचनामे करताय, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

आम्ही वारंवार टीका केल्याने मुख्यमंत्री आता बाहेर पडत आहेत. याबद्दल त्याचे अभिनंदन, असा उपहासात्मक टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे. तसेच आपत्ती परिस्थिती फिल्डवर जाऊन निर्णय घ्यावे लागतात, अशी टीकाही पाटील यांनी केली.

कोरोनात सर्व मदत केंद्राने केली. राज्यात कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सर्व मदत केंद्र सरकारने केली आहे. गोरगरिबांना धान्यापासून, सिलेंडर, पैसे सर्व काही मदत केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. वैद्यकीय मदतही केंद्र सरकारने केली आहे, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अतिवृष्टीबाबत मदत मागण्यासाठी जाण्याचे नियोजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावे, भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जरूर जातील,असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #केंद्राचीजबाबदारी #तुम्हीकायकरणार #चंद्रकांतपाटील #टीका #केल्यावर #मुख्यमंत्री #बाहेरपडले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माहिती गोळा केली जातीय,पण त्याचा अभ्यास करत बसणार नाही; येणे आले तर हात पसरावे लागणार नाही
Next Article केंद्र सरकार पक्षाचे सरकार नाही, राज्याची काळजी घेणे त्यांचेही कर्तव्य; ठाकरेंचा फडणवीसांनीही टोला

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?