लातूर, 11 ऑगस्ट –
लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हा समारंभ जिल्हा परिषदेच्या प्रांगणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार तसेच महायुतीतील विविध पक्षांचे नेते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.