Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाविकास आघाडीला सहकारी पक्षाचा धक्का; १९ मार्चला राज्यभर रास्ता रोको
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

महाविकास आघाडीला सहकारी पक्षाचा धक्का; १९ मार्चला राज्यभर रास्ता रोको

Surajya Digital
Last updated: 2021/03/14 at 10:27 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारला सहकारी पक्षाने धक्का दिला आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही कोणाच्या मागे फरफटत जाणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. राज्यात सत्तेवर येताना अनेक पक्षांची मिळून महाविकास आघाडी आकारास आली. मात्र, सध्या तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हेच महाविकास आघाडीत आहेत. इतर छोट्या पक्षांना ते गृहीत धरत नाहीत, असे शेट्टी म्हणाले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना म्हणजे महाविकास आघाडी, असे काही जण समजत आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही कोणाच्या मागे फरफटत जाणार नाही, ‘गोकूळ’च्या निवडणुकीत ‘स्वाभिमानी’ची ताकद दाखवू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकूळ) निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यात ‘गोकूळ’सह इतर निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या जातील, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. याबाबत ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांना विचारले असता, राज्यात सत्तेवर येताना अनेक पक्षांची मिळून महाविकास आघाडी आकारास आली. मात्र, सध्या तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हेच महाविकास आघाडीत आहेत. इतर छोट्या पक्षांना ते गृहीत धरत नाहीत, असे शेट्टी म्हणाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* १९ मार्चला राज्यभर रास्ता रोको

लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी १९ मार्च रोजी राज्यभर महामार्ग रोको करण्यात येणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. अधिवेशनाच्या सुरुवातीला वीज कनेक्शन तोडणीस स्थगिती द्यायची आणि शेवटच्या दिवशी उठवायची, हा विधिमंडळाचा अवमान आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील सव्वादोन कोटी ग्राहकांची चेष्टा चालविल्याचा आरोपही त्यांनी केला.

लॉकडाऊनच्या काळातील सहा महिन्यांची घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, शिवसेना, ‘माकप’, ‘शेकाप’ , जनता दल, जनसुराज्य’ आदी पक्ष व संघटनांनी गेले दोन-तीन महिने आंदोलन सुरू केले आहे. केरळ, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांनी घरगुती वीज बिलांमध्ये सहा महिन्यांसाठी ५० टक्के सवलत दिली आहे. वीज बिलाप्रश्नी बुधवारी (ता. १७) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सर्वपक्षियांना घेऊन चर्चा करणार असल्याचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले. मुख्यमंत्री यावर निश्चितच तोडगा काढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Co-operative #Partypushes #MahavikasAghadi #Roadblocks #across #State, #महाविकासआघाडीला #सहकारीपक्षाचा #धक्का #१९मार्चला #राज्यभर #रास्तारोको
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लावणीनृत्यातून स्टार झालेल्या बारामतीच्या रिक्षावाल्याला मिळाली चित्रपटात संधी
Next Article ‘ताज महालचं नामकरण लवकरच राम महाल होणार’

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?