Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 12 वर्षाच्या मुलीच्या पोटातून काढला अर्धा किलो केसांचा गोळा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

12 वर्षाच्या मुलीच्या पोटातून काढला अर्धा किलो केसांचा गोळा

Surajya Digital
Last updated: 2021/08/18 at 10:20 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : ठाण्याच्या कल्याणमध्ये एक गंभीर शस्त्रक्रिया पार पडली. 12 वर्षीय मुलीच्या पोटातून 650 ग्रॅम केसांचा गोळा काढण्यात आला. पोटाच्या आतड्यांवर पूर्णपणे ताबा घेतलेल्या केसांचा गोळा दोन तासाच्या शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आला. डॉक्टरांनी सांगितलं, मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीला वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून केस खाण्याची सवय लागली होती. या सवयीला ट्रायकोफेगिया असं म्हणतात.

पोटाच्या आतड्यांवर पूर्णपणे केसाने ताबा घेतला होता. केसांचा गोळाला दोन तासाच्या शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आला. कल्याण पूर्व भागातील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. रोहित परयानी यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली.

मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीला वयाच्या दुसऱ्या वर्षांपासूनच केस खाण्याची वाईट सवय लागली होती. या सवयीला ट्रायकोफेगिया असं म्हणतात. या मुलीच्या पालकांनी तिची ही सवय सोडण्यास खूप प्रयत्न केले. परंतु ती सवय काही केल्याने सुटली नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गेल्या आठवड्यात तिची पोटदुखी वाढल्याने तिला रुग्णालयात दाखल केले. सिटीस्कॅन केल्यानंतर तिच्या आतड्यात पूर्णपणे केस दिसून आले व गेल्या दोन महिन्यापासून तिला जेवण जात नव्हते. पोटावरील गंभीर शस्त्रक्रिया करण्यासाठी लॅप्रोस्कॉपीक पद्धतीचा अवलंब केला जातो. परंतु केसांचा गोळा एवढा मोठा होता की, हा गोळा काढताना केस लॅप्रोस्कॉपीक मशीनमध्ये अडकण्याची भीती होती. त्यामुळे ओपन सर्जरीचा मार्ग निवडला गेला. अथक प्रयत्नातून केसाचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले.

या केसाच्या गोळ्याला वैद्यकीय भाषेत ट्रायकोबीझोअर म्हणतात.  या दुर्मिळ प्रकारात केस खाल्ल्यामुळे असे गोळे तयार होतात. या केसांमुळे पोटाला ईजा होऊन पूदेखील तयार होतो. जसजसा या गोळ्याचा आकार वाढायला लागतो, तसतशी पोटदुखी सुरू होते. अनेकवेळा योग्य निदान झाले नाही तर ती व्यक्ती बेशुद्ध पडू शकते असे डॉक्टरांनी सांगितले.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #12वर्षाच्या #मुलीच्या #पोटातून #अर्धाकिलो #केसांचा #गोळा, #collection #halfkilo #hair #removed #abdomen #girl
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘राजसाहेब तुम्ही प्रबोधनकारांचे नातू की पुरदरेंचे ते सांगा’
Next Article विवाहित महिलेने दुसऱ्या पुरुषासोबत लिव्ह इनमध्ये राहणे बेकायदेशीर – कोर्ट

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?