रायपूर : जिल्हाधिका-यांनी भररस्त्यावर एका तरुणाला कानशिलात लगावले. सोशल मीडियावर नेटिझन्सनी यावर चर्चा सुरु केल्यानंतर त्यातलं सत्य समोर आलं.काल शनिवारी सायंकाळपासून सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल होत होता.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1396465496447283205?s=19
या व्हिडिओमध्ये तरुणाला कानशिलात लगावणारे छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा आहेत. या गैरवर्तणुकीबद्दल त्यांना तातडीने पदावरून हटवल्याचं छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जाहीर केलं आहे.
https://twitter.com/bhupeshbaghel/status/1396327894167683073?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1396327894167683073%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fdesh-videsh-news%2Fsurajpur-collector-chhattisgarh-viral-video-slapping-a-man-violating-lockdown-rules-pmw-88-2478453%2F
यासंदर्भात आयएएस अधिकारी रणबीर शर्मा यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून माफी देखील मागितली आहे. देशातील आयएएस वर्तुळातूनही रणबीर शर्मा यांच्या या वर्तनावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अनेक नेटिझन्सनी ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष्य करत त्यांच्यावर टीका देखील केली. सूजरपूर जिल्ह्यामध्ये करोनाकाळात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील अनेकांकडून लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं दिसून येत आहे. सदर २३ वर्षीय तरूण आपल्या बाईकवरून जात असताना जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांनी तरुणाला हटकलं.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1396457813929463809?s=19
* फोन जमीनवर आपटला
तरुणाने आधी आपण लस घेण्यासाठी जात असल्याचं सांगितलं. पण त्याच्याकडची पावती ही लसीकरणाची नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने पुन्हा आपण वृद्ध आजीला भेटायला जात असल्याचं सांगितलं. पण तरुणाच्या खोटेपणामुळे संतप्त झालेल्या रणबीर शर्मा यांनी त्याचा फोन जमिनीवर आपटून फोडला. एवढंच नाही, तर त्याच्या कानशिलात देखील लगावली. त्याहीपुढे जात त्यांनी आपल्यासोबतच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही तरुणाला मारण्यास सांगितलं.
https://twitter.com/digisysjsr/status/1396352522449670147?s=19