Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात हॉटेलसह अन्य ठिकाणी ५० पेक्षा जास्त लोक आढळले की होणार ‘सील’ची कारवाई
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापुरात हॉटेलसह अन्य ठिकाणी ५० पेक्षा जास्त लोक आढळले की होणार ‘सील’ची कारवाई

Surajya Digital
Last updated: 2021/03/18 at 8:06 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापुरात हॉटेल, बार, मंगल कार्यालय तसेच मॉल्स याठिकाणी ५० पेक्षा जास्त जणांची गर्दी आढळल्यास तत्काळ कारवाई करा, पहिल्या कारवाईतच संबंधित मंगल कार्यालय, मॉल्स आणि हॉटेल सील करा, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी सायंकाळी दिले आहेत.

बुधवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची आढावा बैठक होणार होती. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी कडक नियमावली पुन्हा एकदा जाहीर केली आहे.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांची नियोजित बैठक रद्द झाली. गुरुवारी दुपारी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची याबाबत बैठक झाली. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना आणखी कडक होण्याची चिन्हे आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सिव्हिल हॉस्पिटल आणि अश्विनी हॉस्पिटल्समधील प्रयोगशाळेत आरटीपीसीआर टेस्ट वाढविण्यात आल्या आहेत. सिव्हीलमध्ये टेस्टींगसाठी नवे आरटीपीसीआर मशीन उपलब्ध झाले आहे. आता कोरोनाच्या टेस्ट अधिक गतिमान पद्धतीने होतील. सध्या ॲंन्टीजेन रॅपीड टेस्टींगसाठी हापकीन इन्स्टिट्यूटकडून १ लाख कीट मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली आहे.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेतंर्गत जाहीर केलेल्या नियमावलीचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंगल कार्यालय, हॉटेल, बार आणि मॉल्स हे तत्काळ सील करून राज्य सरकार जोपर्यंत लॉकडाऊन नियमावली शिथिल करत नाही, तोपर्यंत संबंधित सर्व हॉटेल, मंगल कार्यालय बंद राहतील, असे या आदेशात म्हटले आहे.

* नियमावली आणखी कडक

– अंत्यविधीसाठी २० लोकांना परवानगी
– लग्न समारंभात ५० लोकांनाच परवानगी
– हॉटेल, बारमध्ये मास्कशिवाय प्रवेश नसावा
– प्रत्येक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिचे पालन व्हावे
– पॉझिटिव्ह रुग्णावर गृहविलगीकरण्याबाबतचा शिक्का मारावा
– सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांना पूर्णता बंदी
– सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्याला एक हजार रुपये दंड करा
– खाजगी वाहनात गर्दी असल्यास तत्काळ कारवाई करा

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #DistrictCollector #Solapur #Shambharkar #corona, #सोलापुरात #५०पेक्षाजास्त #लोकआढळले #सीलची #कारवाई
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्रीय निमलष्करी पोलीस दलांमध्ये 55 हजार 915 जागांवर भरती प्रक्रिया
Next Article क्रिकेटर पृथ्वी शॉ अभिनेत्रीच्या प्रेमात? जाणून घ्या, कोण आहे ती अभिनेत्री

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?