Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर नवरदेवांचा मोर्चा; लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याची तक्रार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर नवरदेवांचा मोर्चा; लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याची तक्रार

Surajya Digital
Last updated: 2022/12/21 at 6:19 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ कुणी नवरी देता का नवरीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ कुणी नवरी देता का नवरी

 

सोलापूर : लग्नासाठी मुलगी देण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला. हा मोर्चा सोलापुरात निघाला. मोहोळ तालुक्यातील इच्छुक नवरदेवांनी विविध मागण्या करत शहरातील होम मैदानावर एकत्र येत, घोड्यावर बसून वरात काढली आहे. नवरदेवानी स्वतःहून ताशा वाजवला. Maharashtra State Jyoti Kranti Association Navardeva’s march on Collectorate in Solapur; Complaint of not getting a girl for marriage

 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात इच्छुक नवरदेवांनी घोड्यावर वरात काढत निवेदनाद्वारे मागणी केली आहे. आम्हाला मुलगी द्या, समाजात मुली न मिळण्याची समस्या आहेत, त्या अडचणी दूर करा अशा विविध मागण्या करत माथ्यावर मांडावळ्या बांधून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी घोड्यावर बसलेल्या नवरदेवांकडून माहिती घेतली असता शिक्षण झाले, शेती करतो, लग्नाचे वय झाले तरीही मुलगी मिळत नाही अशी खंत त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

महाराष्ट्र राज्य ज्योती क्रांती संघटनेकडून हा मोर्चा काढला. विवाहासाठी इच्छुक असलेल्या अनेक तरुणांनी नवरदेवाच्या वेशामध्ये या मोर्चात सहभाग नोंदवला आहे. संघटनेचे अध्यक्ष रमेश बारसकर यांनी या अनोख्या मोर्चाचे नेतृत्व केले.

 

घोड्यांवर वरात समोर बँड बाजा वाजवत काही नवरदेव बिना नवरीचे सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. हे लग्न नव्हतं तर हा मोर्चा होता. लग्नाला मुलगी मिळत नाही आता आम्ही काय करायचे? म्हणून वैतागलेल्या तरुणांनी नवरदेवाचा वेशभूषेत हा मोर्चा काढून लक्ष वेधले. महाराष्ट्र राज्यातील लग्न न झालेल्या तरुण मुलांना बायको मिळावी या एका प्रमुख मागणीसाठी हा आगळावेगळा मोर्चा सोलापुरात पाहायला मिळाला.

 

संघटनेचे नेते बारसकर यांनी या मोर्चा मागील आपली भूमिका स्पष्ट करताना, युवकांना लग्नाला मुलगी मिळत नसेल तर काय करावे, आई वडील वैतागले, अशांकडे सरकारने लक्ष देऊन त्यांची मागणी सोडवावी अशी भूमिका त्यांनी मांडली.

 

सध्या मुलांची वेळवर लग्न होत नाहीत म्हणून त्या मुलाचे आई-वडील चितेंत आहेत. दुसरीकडे तरुणांनाही या प्रश्‍नाची चिंता आहे. लग्‍न न होणे ही एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे. यामुळे समाजात अनुचित प्रकारामध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे. यावर तातडीने मार्ग काढायला हवा आणि ती शासनाची जबाबदारी असल्याचे, या निवेदनात म्हटले आहे. या वेळी सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भावी नवरदेवांनी वाजत गाजत वरात काढली. यावेळी मुंडावळ्या बांधून वर घोड्यावर बसून या आंदोलनात सहभागी झाले होते.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Maharashtra #State #JyotiKranti #Association #Navardeva's #march #Collectorate #Solapur #Complaint #notgetting #girl #marriage, #सोलापूर #जिल्हाधिकारी #कार्यालय #आवार #महिला #मृतदेह #मुली #फोडला #हंबरडा #खून #आत्महत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आमदार देशमुख – शिंदे सोलापूरच्या दुहेरी जलवाहिनीच्या कामाबाबत आवाज उठवणार
Next Article अक्कलकोट तालुक्यात कॉंग्रेस, भाजपचा जल्लोष

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?