सोलापूर : विजापूर महामार्गावरील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण नागरिकांनी स्वतःहुन दहा दिवसात काढून घ्यावीत, कश अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिला आहे.सोलापूर शहरातील विजापूर नाका ते सैफुल सर्व्हिस रोडवर फळ विक्रेते, भाजीपाला विकणारे तसेच वाळू डेपो इतर अतिक्रमण या ठिकाणी झाले असून आज महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी पाहणी केली. यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे,उपायुक्त तैमूर मुलाणी, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, नगररचना संचालक मनिष भिष्णूरकर, महामार्ग विभागाचे सुतार, राजगुरू, उपअभियंता नीलकंठ मठपती, अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे हेमंत डोंगरे, सुफियान पठाण आदी अधिकारी उपस्थित होते.
विजापूर नाका ते सैफुल सर्व्हिस रोड वरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत खोके, लाकडी खोके, खाद्या पदार्थ, चायनीज गाड्या, कच्चे बांधकाम केलेले गोडावून, लोखंडी खोके असे अतिक्रमण झाले असून ते अतिक्रमण ज्याचे आहे त्यांनी स्वतःहुन काढून घ्यावे अन्यथा कारवाई करावी लागेल, असा इशारा आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिला आहे.
—-