Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची सोलापुरात आत्महत्या, आत्महत्येपूर्वी लिहले भावनिक पत्र
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची सोलापुरात आत्महत्या, आत्महत्येपूर्वी लिहले भावनिक पत्र

Surajya Digital
Last updated: 2023/06/05 at 9:35 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

सोलापूर : सोलापुरात डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठवाड्यातील एका विद्यार्थ्याने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. MBBS student commits suicide in Solapur, emotional letter written before suicide Govt Hospital

 

सोलापूर येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत असलेल्या, एका विद्यार्थीनीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आकाश जोगदंड असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो एमबीबीएस पहिलेच वर्ष पास होत नसल्याने नैराश्यातून त्यांने हे पाऊल उचले. आकाश जोगदंड याने आत्महत्येपूर्वी भावनिक पत्र लिहिले होते.

मृत आकाश याने डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय महाविद्यालयात २०२० साली एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. परंतु वारंवार परीक्षा देऊन अपयश येत होते. सलग तीन वर्षे अपयशीच ठरल्याने तो नैराश्येत होता, अशी माहिती अनधिकृत सूत्रांनी दिली. या घटनेचा तपास फौजदार चावडी पोलीस करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश जोगदंड याने आत्महत्येपूर्वी भावनिक पत्र लिहिले होते. माझ्या मृत्यूची माहिती आईला व बाबांना सांगू नका, ते सहन करणार नाहीत. मी आत्महत्या केल्याची माहिती माझ्या मामाना सांगा असा मजकूर लिहीत, आकाशने मामाच संपर्क क्रमांक चिट्टीत नमूद केला होता. सोलापूर पोलिसांनी आकाशच्या मामाला सोलापुरात बोलावून घेतले आहे. आकाशच्या मृतदेहावर सोलापूर पोलिसांनी पंचनामा करून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह दाखल केले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

एमबीबीएसची तयारी करणार्‍या विद्यार्थ्याला नैराश्याने ग्रासल्याने त्याने आत्महत्या केली. सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमधील विद्यार्थ्याने शहरातील रितेश हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याने गळफास घेतल्याची माहिती पसरताच शासकीय रुग्णालयात भावी डॉक्टरांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद यांनी अधिकृत माहिती दिली. आकाश संतोष जोगदंड (वय 24 रा. चौसळा, जि. बीड) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

आकाश जोगदंड याने 2020 साली एमबीबीएसच्या प्रथम वर्षात सोलापुरातील डॉ व्ही एम मेडिकल कॉलेज या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. 2020 पासून तो सतत परीक्षा देत होता, मात्र पहिलेच वर्ष पास होत नसल्याने तो नैराश्यात गेला होता. तीन वर्षांपासून आकाश सतत नापास होत असल्याने तो तणावात जीवन जगत होता. अखेर आकाश जोगदंडने सोमवारी 5 जून रोजी सकाळी आत्महत्या करून जीवन यात्रा संपवली. आकाश जोगदंडचे मामा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते.

आकाश जोगदंड हा एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होता. 2020 पासून तो सतत परीक्षा देत होता, मात्र पहिलेच वर्ष पास होत नव्हता त्यामुळे तो तणावात राहत होता. यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचले असल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद यांनी सांगितले.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #MBBS #student #commits #suicide #Solapur #emotional #letterwritten #suicide #GovtHospital, #एमबीबीएस #विद्यार्थी #सोलापूर #आत्महत्या #आत्महत्येपूर्वी #भावनिक #पत्र #शासकीय #रुग्णालय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article किंमत नसणारे नेते नाना पटोलेंच्या गाडीत : चेतन नरोटेंचा रोख नेमका कोणाकडे ? तर्कवितर्क सुरू
Next Article शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपाचे 6, शिंदे गटाचे 4 नवे मंत्री !

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?