Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: साव कलाल समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध : सुनील खराटे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

साव कलाल समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध : सुनील खराटे

admin
Last updated: 2025/05/05 at 2:20 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 5 मे (हिं.स.)संत महात्म्यांच्या विचारांची कास धरून सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन समाजभिमुख उपक्रम राबवित साव कलाल समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय साव कलाल समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवसेना नेते सुनील खराटे यांनी केले. साव कलाल समाजाचे आराध्य संत सावजी महाराज यांच्या कार्याचा परिचय समाजातील युवा वर्गाला व्हावा तसेच त्यांचे नेहमी स्मरण व्हावे या उदात्त हेतूने अखिल भारतीय साव कलाल समाजातर्फे संत सावजी महाराज यांचा पुतळा अमरावती येथील स्मशानभूमी मध्ये स्थापन करण्यात आला असून १ मे रोजी सावजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुनील खराटे बोलत होते.

स्मशानभूमीतील सावजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुनील खराटे यांच्या हस्ते पूजन व हार अर्पण करून अनावरण करण्यात आले. यावेळी सावजी महाराज यांची मुलगी, जावई, नातू राम धामंदे तसेच सावकालाल समाजाचे वरिष्ठ पदाधिकारी राष्ट्रीय सचिव अमोल चवणे, सुनील राऊत, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सचिन पहाडे, , अमरावती जिल्हा अध्यक्ष गजानन कोल्हटकर, कार्याध्यक्ष नितीन कोल्हटकर, महिला आघाडीचा राष्ट्रीय अध्यक्ष सुनिता ताई बावनेर, प्रकाश दादा टाकळे, सतीश खराटे, सुनील समदुरकर, डॉ आशिष डगवार , सुरेंद्र जयस्वाल , महिला आघाडी सचिव सौ योगीता शंकरपुरेआदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थित सावजी महाराज यांची मुलगी सौ विमलताई धामंदेयांनी आपले मनोगत व्यक्त करीत आज जयंतीच्या निमित्ताने सावजी महाराज यांच्या आठवणी जिवंत झाल्या असून त्यांचा पुतळा उभारून अखिल भारतीय साव कलाल समाजाने प्रशंसनीय कार्य केल्याचे त्या म्हणाल्या. याप्रसंगी ज्ञानेश्वर पाहाडे, प्रल्हादराव डगवार, चंद्रकांत दुधाने , प्रविन सावळे , मोहन मोहीते , ॲड नितीन कोल्हटकर , अविनाश पाटील, राजेंद्र पेलागडे , अरुण कट्यारमल , सतिश देवरे, ललीत समदुरकर, ज्ञानेश्वर घोडेराव, किरन शिंदे , अनंत लौटे, निळकंठ लोहकपुरे , सीमाताई पेलागडे, चंदाताई ददगाळ , किशोर सावळे आदित्य पेलागडे , राजेश लोहटे वमहाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले समाज बांधव उपस्थित होते.—————

You Might Also Like

एअर इंडियाची 8 उड्डाणे रद्द

वारकऱ्यांची सेवा करणारे सर्वजण पंढरीचे ‘वारीवीर’च  – चंद्रकांत पाटील

अहमदाबाद : विमान अपघातातील २१५ मृतदेहांची ओळख पटली, १९८ मृतदेह नातेवाइकांना सुपूर्द

एका नवीन क्रांतीची सुरुवात बारामतीतून – शरद पवार

क्युएस रॅंकिंगमध्ये जागतिक स्तरावर पुणे विद्यापीठ ५६६ व्या स्थानी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर बनवलेल्या चित्रपटांवर लादला १०० टक्के कर
Next Article पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा – मुख्यमंत्री

Latest News

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
राजकारण June 20, 2025
एअर इंडियाची 8 उड्डाणे रद्द
महाराष्ट्र June 20, 2025
विरोधकांनी आपल्या पॅनेलचे चेअरमन जाहीर करावेत – अजित पवार
राजकारण June 20, 2025
मुंबई विमानतळावर थायलंडहून आलेला 25 किलो गांजा जप्त
Top News June 20, 2025
वारकऱ्यांची सेवा करणारे सर्वजण पंढरीचे ‘वारीवीर’च  – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 20, 2025
बँक अध्यक्ष बच्चू कडूंची अपात्रता, हायकोर्टात 24 जूनला सुनावणी
राजकारण June 20, 2025
खामेनी यांचे अस्तित्व संपवून टाकण्याचा इस्रायलचा लष्कराला आदेश
देश - विदेश June 20, 2025
अहमदाबाद : विमान अपघातातील २१५ मृतदेहांची ओळख पटली, १९८ मृतदेह नातेवाइकांना सुपूर्द
महाराष्ट्र June 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?