Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सीबीआय चौकशी आणि ईडीवरून नियोजन समितीच्या बैठकीत गदारोळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सीबीआय चौकशी आणि ईडीवरून नियोजन समितीच्या बैठकीत गदारोळ

Surajya Digital
Last updated: 2021/10/26 at 4:45 PM
Surajya Digital
Share
9 Min Read
SHARE

सोलापूर : कोरोना निधी खर्चात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार करीत माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी याप्रकरणी आपण सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगताच पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे चांगलेच भडकले आणि सीबीआयच काय ईडीची पण चौकशी  लावा म्हणत उपरोधिक टोला लगावला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या आरोप प्रत्यारोपांनी सभागृहात गदारोळ झाला.

सोमवारी पार पडलेल्या नियोजन समितीच्या बैठकीत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून काम केलेल्या अक्कलकोट येथील कोविड सेंटरमधील कर्मचार्‍यांचा पगारच दिला नसल्याचा मुद्दा पालकमंत्री भरणे यांच्यासमोर मांडला. त्याचवेळी आमदार सातपुते यांनी कोरोना काळात निधी खर्चामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची बाब सभागृहात मांडून याप्रकरणी आपण सीबीआय चौकशी करणार असल्याचे सांगितले.

त्यावेळी संतापलेले पालकमंत्री भरणे यांनी सीबीआयबरोबरच ईडीची चौकशी लावण्याचे आव्हान दिले. यावेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यानंतर  नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी माळशिरस तालुक्यातील मातंग समाजातील मृत व्यक्तिला स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करू दिले नव्हते. मतदारसंघात गंभीर प्रकार घडला असताना त्यावेळी आमदार राम सातपुते कुठे होते? असा सवाल उपस्थित करताच सभागृहात गोंधळ उडाला.

 

आमदार सातपुते यांनी लगेच खुलासा केला की, हा प्रकार माझ्या मतदारसंघात नव्हता तर तो माढा तालुक्यात घडला होता. पण आपण त्याठिकाणी जाऊन समस्या जाणून घेतली होती, हे चंदनशिवे यांनी लक्षात घ्यावे. एकूणच सीबीआय आणि ईडीची चर्चा राज्यभर सुरू असताना गेल्या दोन दिवसापासून सोलापुरातही या चर्चेने जोर धरला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रविवारी आमदार प्रणिती शिंदे यांनी भविष्यात आपल्यावर देखील ईडीचा छापा पडेल असे वक्तव्य केले होते. त्यानंतर लगेच सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीच ईडीचा उच्चार केल्याने यापुढील काळातही ईडीचा नावाचा वापर करत राजकीय टोलेबाजी करण्यात होईल हे  मात्र निश्चित आहे.

* पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील नियोजन समितीकडून सन 2020-21 जिल्हा वार्षिक योजनेच्या 574 कोटीच्या खर्चास मान्यता

जिल्‍हा वार्षिक योजना सन 2021-22 चा 625 कोटीचा निधी विहित वेळेत खर्च करावा

– पालकमंत्री दत्तात्रय भरणे

· जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या विकासाची नोंद घेऊन निधीचा पुरवठा करणार

· महापालिकेच्या हद्दवाढ भागातील 36 शाळांच्या दुरुस्ती करता पहिल्या टप्प्यात दोन कोटीचा निधी मंजूर

·जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची वीज जोडणी खंडित करू नये

·राज्यात ऑक्सीजन निर्मितीत स्वयंपूर्ण झालेला सोलापूर जिल्हा प्रथम

·राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज पुरवठा केला पाहिजे

· रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कामे प्रस्तावित करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा

·सोलापूर शहरातील स्मार्ट सिटीच्या कामाच्या अनुषंगाने स्वतंत्र बैठकीचे आयोजन

· ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या नावाने राज्य स्तरावरून योजना जाहीर करण्यासाठी नियोजन समितीकडून ठराव मंजूर

· पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात भरघोस निधी दिल्याबद्दल सदस्याकडून अभिनंदनाचा ठराव

सोलापूर – जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत सर्वसाधारण 470 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 151 कोटी 10 लाख व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 4 कोटी 15 लाख असा एकूण 625 कोटी 25 लाखाचा जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर असलेला निधी सर्व संबंधित यंत्रणांनी विहित कालमर्यादेत व मंजूर असलेल्या कामावर खर्च करण्याचे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री. भरणे मार्गदर्शन करत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, खासदार डॉ. जय सिद्धेश्वर, खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस उपायुक्त दीपाली धाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे पुढे म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत यावर्षीही कोरोनासाठी राखीव निधी ठेवण्यात आलेला आहे. तरीही जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील विकासाची नोंद घेऊन त्या विकास कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात येणार आहे. सोलापूर महापालिकेची हद्दवाढ झालेल्या भागातील जिल्हा परिषदेच्या 36 शाळांच्या दुरुस्ती करीता पहिल्या टप्प्यात दोन कोटीचा निधी मंजूर करण्यात येत असल्याचे सांगून उर्वरित निधीही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वीज वितरण कंपनीने कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पाची वीज जोडणी खंडित करू नये असे निर्देश पालकमंत्री भरणे यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांकडे असलेल्या वीज बिलाच्या थकबाकी बाबत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची ऊर्जा मंत्री यांच्याकडे मुंबई येथे पुढील दोन दिवसांनी बैठक घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी ऊर्जा मंत्र्यांना विनंती करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

कोरोना काळात कोविड सेंटर मध्ये काम केलेल्या व आज पर्यंत मानधन मिळाले नाही अशा सर्व कर्मचाऱ्यांना त्वरित मानधन मिळण्यासाठी आरोग्य विभागाने योग्य ती दक्षता घ्यावी. कोरोना काळात सर्वांनी चांगले काम केले असून रुग्णांची संख्या कमी होत असली तरी अजून करून गेलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी. राज्यात ऑक्सिजन निर्मिती सोलापूर जिल्हा स्वयंपूर्ण झालेला पहिला जिल्हा आहे, अशी माहिती श्री. भरणे यांनी यावेळी दिली.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अतर्गत जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कामे प्रस्तावित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा. तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांच्याकडे मागणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला तात्काळ पिक कर्ज पुरवठा केला पाहिजे असे निर्देश पालकमंत्री भरणे यांनी यावेळी दिले. सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात सुरु असलेल्या कामाविषयी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या तक्रारीच्या अनुषंगाने एकंदरीतच स्मार्ट सिटी कामाच्या गति बाबत पुढील पंधरा दिवसात एक स्वतंत्र आढावा बैठक घेण्यात येऊन या अंतर्गत च्या सर्व कामांना गती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वीज वितरण कंपनीने थकबाकी अभावी वीज जोडणी तोडू नये असे सूचना केली तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्जाचे वाटप तालुका निहाय करावे असे सांगितले.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गौण खनिजाचा जिल्ह्याचा तीन कोटीचा निधी असून सदरील निधी वाटपाबाबत पालकमंत्री च्या अध्यक्षतेखाली समिती असून त्या समितीकडून निधी वाटपाबाबत निर्देश देण्यात येतील असे सांगितले. तसेच जिल्ह्यात प्रशासनाकडून विविध ठिकाणी जप्त केलेली वाळू घरकुलाच्या कामासाठी देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही श्री शंभरकर यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी विविध विषयाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेकडून त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दराडे यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 खर्चास मान्यता देणे, सन 2021-22 चा खर्च, मागील बैठकीचे इतिवृत्त व अनुपालन या विषयाची माहिती बैठकीत सादर करून त्यावर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, संजय शिंदे, शहाजीबापू पाटील, यशवन्त माने, समाधान औताडे, राजेंद्र राऊत सह अन्य समिती सदस्य उपस्थित होते.

* सन 2020-21 च्या 574 कोटीच्या खर्चास मान्यता

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील नियोजन समितीकडून सन 2020-21 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 574.12 कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली. यात सर्वसाधारण योजनेच्या 421.99 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना च्या 151.38 कोटी व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 75 लाख अशा एकुण 574 कोटी 12 लाखाच्या खर्चास समितीने मान्यता प्रदान केली.

* विविध ठरावांना मंजुरी

ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या नावाने राज्यस्तरावरून शासनाने योजना जाहीर करावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली.

तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातील सदस्यांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल समिती सदस्यांनी पालकमंत्र्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला.

* लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांच्या सूचना

जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांनी जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात वीज, रस्तेदुरुस्ती, पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करणे, पीक कर्ज वाटप, रोजगार हमी योजनेची कामे प्रस्तावित करणे, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत चे कामे गतीने होणे, समशान भूमी ची कामे होणे तसेच विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देणे आदी बाबत मागण्या व सूचना करून त्या वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले.

* श्रद्धांजली

ज्येष्ठ नेते माजी आमदार, माजी मंत्री स्वर्गीय गणपतराव देशमुख तसेच कोरोना मुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना जिल्हा नियोजन समितीने दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.

* नवीन सदस्यांचा सत्कार

जिल्हा नियोजन समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुष्पगुच्छ देऊन केला.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #CBI #inquiry #ED #commotion #planning #committee #meeting, #सीबीआय #चौकशी #ईडी #नियोजन #समिती #बैठकीत #गदारोळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चीनमध्ये ४० लाख लोकसंख्या असलेल्या शहरात पुन्हा लॉकडाऊन
Next Article शिवसेनेच्या गावांना निधी देत नसल्याने आमदार मानेंचा शिवसैनिकांनी केला निषेध

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?