Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । ग्रीनफिल्डवरचा शेतकरी भांडून भांडून वैतागला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

सोलापूर । ग्रीनफिल्डवरचा शेतकरी भांडून भांडून वैतागला

Surajya Digital
Last updated: 2023/04/02 at 6:44 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
○ जमिनी गेल्या, मोबदलाही गेला, नशिबी संताप आलास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

○ जमिनी गेल्या, मोबदलाही गेला, नशिबी संताप आला

 

सोलापूर : सुरत – चेन्नई प्रस्तावित महामार्गासाठी अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातून संपादित करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर शासनाचा ताबा आला असून या जमिनीवरील शेतकऱ्यांचे अधिकार आता संपुष्टात आले आहेत. यासंदर्भात प्रसिध्द झालेल्या राजपत्रातून ही बाब उघडकीस आली आहे. Solapur Land Compensation Fate Anger Farmer on Greenfield Fight Frustrated Akkalkot

 

बाधित शेतकऱ्यांना हातावर नुकसान भरपाई म्हणून एक पैसुध्दा टेकवला नाही. यामुळे बाधित शेतकऱ्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला असल्याचे संघर्ष समितीचे बाळासाहेब मोरे यांनी ‘सुराज्य’शी बोलताना सांगितले.

 

अक्कलकोट तालुक्यातून जात असलेल्या सुरत-चेन्नई या राष्ट्रीय महामार्गासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. यासाठी भूसंपादन विभागाच्यावतीने अधिसूचना जाहीर करून हरकती मागविण्यात आल्या होत्या. दाखल हरकती सुनावणी घेऊन निकाली काढल्या आहेत.

ज्या जमिनी प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गामध्ये बाधित होणार आहेत; त्यांनी तातडीने संबंधित जमिनीबाबत असलेले हितसंबंध, मालकीचे हक्काचे स्वरूप तसेच नुकसानभरपाई मिळण्याच्या मागणीसंबंधीचे निवेदन घेऊन पुराव्यासह १० एप्रिलपर्यंत भूसंपादन अधिकारी यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा, अशा प्रकारच्या नोटिसाही जारी केल्या आहेत.

दिलेल्या मुदतीपर्यंत जर बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आले नाही तर संबंधितांना याबाबत काहीही म्हणायचे नाही अथवा त्यांची पुढे कोणत्याही प्रकारची हरकत असणार नाही, असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे राजपत्रात प्रसिध्द केले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

○ शासनाच्या विरोधात हायकोर्टात

वाढीव मोबदला देण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नसताना अक्कलकोट तालुक्यातील सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी संपादीत केलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांचा विरोध असूनही राजपत्र जाहीर झाल्याने यावर जमिनीवर सरकार अधिकार आला आहे. या राजपत्राच्या आणि ६ ऑक्टोबर २०२१ रोजी काढलेल्या जीआरच्या विरोधात हायकोर्टात जाणार आहोत. अॅड. महादेव चौधरी यांच्या माध्यमातून प्रक्रिया चालू आहे, असे बाळासाहेब मोरे (सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड संघर्ष समिती अध्यक्ष ) यांनी सांगितले.

 

○ शेतकऱ्यांवर जबरदस्तीच केली

नुकसान भरपाई योग्य आणि अधिक प्रमाणात मिळावी यासाठी अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध प्रकारची आंदोलने केली होती. जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही, तोपर्यंत भूसंपादन होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. याप्रश्नी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लक्ष घालून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. पण हे आश्वासन हवेतच विरले आहे. नुकसानभरपाईचा , महत्त्वाचा मुद्दा प्रलंबित असताना शासनाने राजपत्र प्रसिध्द करून शेतकऱ्यांवर एक प्रकारे जबरदस्तीच केली असल्याचा आरोप बाधितांनी केला आहे.

 

○ खरेदी विक्रीला निर्बंध

शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. पालकमंत्र्यांनी जमीन संपादनाची प्रक्रिया थांबण्याचे आदेश दिले असताना महामार्गासाठी संपादीत जमिनीचे राजपत्र जाहीर झाले. संपादीत जमिनीवर शासनाचे नाव लागणार आहे. परिणामी या जमिनीची खरेदी विक्री बंद होणार आहे. यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. बार्शीनंतर आता अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी मोठा उठाव करण्याच्या तयारीत आहेत.

 

 

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #Solapur #Land #Compensation #Fate #Anger #Farmer #Greenfield #Fight #Frustrated #Akkalkot, #सोलापूर #ग्रीनफिल्ड #अक्कलकोट #शेतकरी #भांडून #भांडून #वैतागला #जमिनी #मोबदला #नशिबी #संताप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘अमृत’पालातील विष : भिंद्रनवाले 2.0; …. अन् अचानक अंगात भिंद्रनवाले शिरला
Next Article चैत्री एकादशी निमित्त ‘हरी’ नामाच्या जयघोषाने पंढरी दुमदुमली

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?