Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हरियाणातील धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या सोलापुरातील तरुणाचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळसोलापूर

हरियाणातील धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या सोलापुरातील तरुणाचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2021/09/22 at 10:57 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : हरियाणा येथे धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या सोलापूरच्या युवक खेळाडूचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. एक पैलवान व धावपटू म्हणून नावारूपास येऊ लागलेला बंडू आकस्मात गेल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. करमाळ्यातील सुपनवर वस्ती येथे शोककळा पसरली असून सर्वच परिवारातून दुःख व्यक्त केले जात आहे.

करमाळा श्री कमलादेवी स्पोर्टस्‌ क्‍लबच्या वतीने हरियाणा येथे धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी बंडू दत्तात्रय वाघमोडे (वय 21) याचे महक (जि. रोहतक, हरियाणा) येथे ता. 19 धावण्याच्या स्पर्धेदरम्यान आकस्मात निधन झाले आहे. करमाळा तालुक्‍यातून दहा युवक या स्पर्धेला गेले आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांचा मृतदेह करमाळा येथे आणून त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना समजल्यानंतर प्रशिक्षक दिनेश जाधव तसेच बंडू वाघमोडेचे बंधू नामदेव वाघमोडे व अशोक वाघमोडे हे हरियाना येथे जावून त्यांनी पार्थिव सोलापूरला आणले.

बंडू वाघमोडे यांचा भाऊ नामदेव वाघमोडे, अशोक वाघमोडे, पोथऱ्याचे शिंदे व अकॅडमीचे संचालक दिनेश जाधव हे हरियाना येथे गेले. शवचिकित्सा झाल्यानंतर व सर्व कायदेशीर प्रक्रिया संपल्यावर सोलापूरला पाठवण्यात आले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

वाघमोडे परिवार मुळचा निलज येथील रहिवाशी आहेत. ते अलिकडे सुपनवर वस्तीवरती राहत आहेत. दत्तात्रय वाघमोडे हे मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात. त्यांना बंडू व नामदेव अशी दोन मुले व दोन मुली आहेत. नामदेव हा जेसीबी ऑपरेटर असून बंडू हा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात व्दित्तीय वर्षाला आहे. येथील दिनेश जाधव यांच्या श्री कमलादेवी स्पोर्टस्‌ क्‍लबमध्ये बंडू वाघमोडे सराव करत होता. बंडू यास पोलीस खात्यात जाण्याची इच्छा होती व तो त्याची तयारी करत होता. हरियाना येथील महक (जि. रोहतक) येथे 19 सप्टेंबर पासून आंतरराज्य स्पर्धा सुरू झाल्या आहेत.

करमाळा तालुक्‍यातून दहा युवक या स्पर्धेला गेलेले आहेत. त्यापैकी पहिल्याच दिवशीच बंडू वाघमोडे धावण्याच्या स्पर्धेत धावत असताना तो कोसळला व त्याचा मृत्यू झाला. ही हकीकत घरी समजल्यानंतर वाघमोडे परिवारात दुख व्यक्त होत आहे. सोलापूरच्या खेळाडूचा मृत्यू झाला  असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पण त्याचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण समजू शकले नाही.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

TAGGED: #youngman #Solapur #participating #competition #Haryana #died, #हरियाणात #धावण्याच्या #स्पर्धेत #सहभागी #सोलापुरातील #तरुणाचा #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जागेच्या विक्रीवरुन काँग्रेस नगरसेवकांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
Next Article कर्ज देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

Latest News

Gentle Monster Jennie Kpop Sunglasses Up to 30% Off
Top News December 6, 2025
test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?