Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: संघाच्या प्रतिनिधीसभेत बांगलादेशवर चिंता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

संघाच्या प्रतिनिधीसभेत बांगलादेशवर चिंता

admin
Last updated: 2025/03/22 at 6:36 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सहसरकार्यवाह अरुण कुमार यांची माहिती

बंगळुरू, 22 मार्च (हिं.स.) : कर्नाटकातील बंगळुरू येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधीसभेची बैठक सुरू आहे. यात बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजाच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त करण्यात आल्याची माहिती संघाचे सहसरकार्यवाह अरुणकुमार यांनी दिली.

यासंदर्भातील निवेदनात अरुणकुमार म्हणाले की, बांगलादेशात अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराचे कारण केवळ राजकीय नाही तर धार्मिक देखील आहे. आम्ही बांगलादेशातील हिंदू समुदायाला पाठिंबा देतो. बांगलादेशातील हिंसाचार सत्ता परिवर्तनामुळे नसून त्यामागे धार्मिक कारणे देखील आहेत. यातूनच अल्पसंख्याक आणि हिंदूंना सतत लक्ष्य केले जात आहे. धार्मिक अल्पसंख्याकांवरील हिंसाचार नवीन नाही. यापूर्वी 1951 मध्ये बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या 22 टक्के होती. त्यात घट होऊन तेथे आता 7.95 टक्के हिंदू शिल्लक आहेत. हिंदूंच्या विरोधातील हिंसाचाराला तेथील सरकारचाही पाठिंबा असल्याचे दिसून येते. बांगलादेशात भारतविरोधी भावना वाढत आहे. संघाने आपल्या प्रस्तावात आंतरराष्ट्रीय शक्तींबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. भारत आणि त्याचे शेजारी देश हे केवळ देशांचा समूह नाहीत तर त्यांचा इतिहास सामायिक आहे. आपल्यात बरेच साम्य आहे. अनेक जागतिक शक्ती भारत आणि त्याच्या शेजारील देशांमध्ये अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे अरुणकुमार म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसांची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा शुक्रवारपासून बेंगळुरूमध्ये सुरू आहे. या बैठकीत बांगलादेश हिंसाचार तसेच मणिपूर, भाषा वाद आणि संघाच्या शताब्दी समारंभांबाबत ठराव मंजूर केले जातील.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबद्दल विचारले असता अरुण कुमार म्हणाले की, संघाच्या अंतर्गत 32 हून अधिक संघटना काम करतात. प्रत्येक संस्था स्वतः स्वतंत्र असते आणि तिची निर्णय घेण्याची प्रक्रिया स्वतंत्र असते. प्रत्येक संस्थेचे स्वतःचे सदस्य असतात, निवडणुका असतात आणि त्यांची संपूर्ण प्रक्रिया वेगळी असते. भाजप आणि संघ यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही देश आणि समाजासाठी एकत्र काम करतो. संघटनेची प्रक्रिया सुरू आहे आणि जिल्हा आणि राज्य पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. भविष्यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणुका होतील असे त्यांनी सांगितले.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Dismiss the Waqf Board which has not submitted audit reports for seventeen years - Adv. Virendra Ichalkaranjikar सतरा वर्षे लेखापरीक्षण अहवाल सादर न करणारे वक्फ बोर्ड बरखास्त करा – ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर
Next Article गुंडाळलेला ‘हा’ प्रकल्प साकारण्यासाठी घडामोडी वेगात

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?