Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सामूहिक दुष्कर्मप्रकरणी विष्णू बरगंडेला पोलीस कोठडी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सामूहिक दुष्कर्मप्रकरणी विष्णू बरगंडेला पोलीस कोठडी

Surajya Digital
Last updated: 2023/02/24 at 12:57 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : एका महिलेवर सामूहिक दुष्कर्म केल्याप्रकरणी येथील विष्णू गुलाब उर्फ चंद्रकांत बरगंडे (वय-47,रा.औसे वस्ती,आमराई) यास अटक करून तपास अधिकारी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जयश्री काकडे यांच्यासमोर हजर केले असता आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. Chapat bus conductor in Vishnu Burgandela police custody in gang rape case

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● बस कंडक्टरला शिवीगाळ करीत श्रीमुखात लगावली

 

31 ऑक्टोबर 2021 रोजी आरोपी बरगंडे व मुख्य आरोपी गणेश कैलास नरळे यांनी संगनमत करून फिर्यादीस ठार मारण्याची व तिची बदनामी करण्याची धमकी देऊन पुणे येथे फिर्यादीची इच्छा नसताना देखील तिच्यावर आळीपाळीने सामूहिक दुष्कर्म केले,अशा आशयाची फिर्याद पीडितेने नरळे व बरगंडे यांच्याविरुद्ध दिली होती.

दरम्यान, सदर गुन्ह्यात फौजदार चावडी पोलिसांनी नरळे यास अटक केली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 417 अंतर्गत दोषारोपपत्र पाठवून आरोपी बरगंडे यास गुन्ह्यातून वगळण्याचा अहवाल न्यायालयात दाखल केला होता. तदनंतर फिर्यादीने सदर अहवालाविरुद्ध व प्रकरणाचा निष्पक्षपाती तपास व्हावा म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पीडितेच्या याचिकेची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ केडर आयपीएस अधिकार्‍याने करावा, असे निर्देश दिले होते.

त्याप्रमाणे पोलीस महासंचालकांनी हा गुन्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांच्याकडे वर्ग केला होता. त्यानंतर त्यांनी बुधवारी आरोपी बरगंडे यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले. तपास अधिकार्‍यांनी आरोपीला सात दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायाधीशांनी सरकारी वकील, तपास अधिकारी व आरोपींचे वकील यांचा युक्तिवाद ऐकून आरोपीस पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली.

यात मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड.प्रशांत नवगिरे,अ‍ॅड.श्रीपाद देशक,सरकारतर्फे अ‍ॅड.आसावरी जोशी तर आरोपीतर्फे अ‍ॅड.शांतवीर महिंद्रकर यांनी काम पाहिले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

● बस कंडक्टरला शिवीगाळ करीत श्रीमुखात लगावली

 

मोहोळ : बस कंडक्टरला शिवीगाळ करित गच्ची धरून मारहाण करीत दमदाटी केल्याने एकावर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आज गुरुवारी दुपारी तीन वाजणेच्या सुमारास नरखेड जवळ घडली

याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विष्णू जनार्धन काटे हे मोहोळ बार्शी बस घेऊन बार्शीकडे निघाले होते. एक इसम बस मध्ये पुढे मागे न सरकता एकाच जागेवर उभा होता. बस मध्ये चढलेल्या प्रवाशाना पुढे सरकण्यात अडथळा करित होता. त्यास कंडक्टरने पुढे जाण्यास वारंवार सांगूनही तो ऐकत नव्हता.

कंडक्टरने नरखेड येथे जास्त प्रवासी चिडल्याने गर्दी झाल्यामुळे जवळ जावुन पुढे सरका, असे सांगितले. असता त्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत कंडक्टरला गच्चीला धरून चापट मारली. धक्काबुक्की करून तु पुढे चल, मालवंडीत चल तुला बघतोच, तु तिकीट कसे काढतो, ते बघतोच अशी धमकी दिली. त्यामुळे एस टी बस मोहोळ पोलिस ठाण्यात नेली. याबाबत अभय सुखदेव भडकवाड ( रा अनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस हवालदार आदलिंगे हे करीत आहेत.

 

You Might Also Like

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी

सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग

पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव

सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट

TAGGED: #Chapat #busconductor #VishnuBurgandela #policecustody #gangrape #case, #सामूहिक #दुष्कर्मप्रकरणी #विष्णूबरगंडे #पोलीस #कोठडी #बस #कंडक्टर #श्रीमुखात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article न्यायालयाने हा प्रकार वैध ठरवला तर हृदयाजवळ ठेवलेल्या गोष्टीचा मृत्यू होईल
Next Article एनटीपीसीत नोकरीचे आमिष पडले महागात; चौघांना पंचवीस लाखांचा गंडा

Latest News

सांबा सेक्टरमध्ये 7 घुसखोरांना कंठस्नान
देश - विदेश May 9, 2025
संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन
Top News May 9, 2025
सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या
सोलापूर May 9, 2025
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी
सोलापूर May 9, 2025
सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग
सोलापूर May 9, 2025
crime
पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव
सोलापूर May 9, 2025
पंजाबमध्ये सर्व शैक्षणिक संस्था बंद, परीक्षा रद्द
देश - विदेश May 9, 2025
सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट
सोलापूर May 9, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?