Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अदानी उद्योग समूहाच्या चौकशीसाठी काँग्रेसचा स्टेट बँकेवर मोर्चा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

अदानी उद्योग समूहाच्या चौकशीसाठी काँग्रेसचा स्टेट बँकेवर मोर्चा

Surajya Digital
Last updated: 2023/02/06 at 2:54 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 कसबा पोटनिवडणूक – काँग्रेसचा उमेदवार जाहीर

घोडेश्वर : मोहोळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने घोडेश्वर येथील भारतीय स्टेट बँक आँफ इंडिया या बँकेवर आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी यांनी केले. बँकेसमोर गर्दी झाली होती. Congress marches on State Bank to probe Adani Udyog Group

 

सुलेमान तांबोळी म्हणाले, अदानी समूहातील आर्थिक गैरकारभाराचा पर्दापाश करणार्‍या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी अथवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधिशांच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी. एल आय सी ,स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर वित्तिय संस्थामधील अदानी समूहातील केलेल्या मोठ्या गुंतवणुकी संदर्भात संसदेत चर्चा व्हावी व गुंतवणुकदारांच्या पैशाला संरक्षण मिळावे यासाठी सरकारने योग्य ते निर्णय घ्यावेत.

 

यावेळी मुजीबभाई चौधरी, सागर सरवळे, मेजर दादासाहेब पाटील यांची भाषणे झाली. निवेदन स्टेट बँकेचे मॅनेंजर यांना देण्यात आले. एपीआय अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला.

यावेळी सरपंच प्रकाश सपाटे, आप्पा पवार,नागेश वाघ,राहील पवार,महादेव यादव,राजु भोई, सिध्देश्वर वराडे,सागर गरड,सचिन घोडके,प्रशांत पाटील,भगवान मामा आसबे,आण्णा जाधव,अनिल सरवळे,ईब्राहिम शेख बाळासाहेब जमादार,अनिल काकडे,आकाश जाधव,सौरभ कांळे,सरदार तांबोळी,रामभाऊ सुरवसे,राजाभाऊ खांडेकर,जावेद तांबोळी,शिवाजी सुतार,अविनाश खोत,इरफान बागवान ,शकिल शेख,यासीन तांबोळी ,रियाज तांबोळी,प्रशांत पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 कसबा पोटनिवडणूक – काँग्रेसचा उमेदवार जाहीर

 

पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे उमेदवार हेमंत रासने लढत पाहण्यास मिळणार आहे.

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी टिळक कुटुंबीयांची भेट घेतली. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक नाराज असल्याचे वृत्त होते. त्यानंतर आता धंगेकरांनी शैलेश टिळकांची भेट घेतली आहे. ‘या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. टिळक कुटुंब अजून दुःखातून सावरू शकलेले नाही. आपण सर्वांनी त्यांना आधार देण्याची गरज आहे’, असे धंगेकर यांनी म्हटले आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Congress #marches #StateBank #probe #AdaniUdyogGroup, #अदानी #उद्योग #समूह #चौकशी #मोहोळ #घोडेश्वर #काँग्रेस #स्टेट #बँक #मोर्चा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article खासदार सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 173 टक्क्यांची वाढ, सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया
Next Article सोलापूर । व्यापा-याच्या घरातून लाखोंची रोकड लंपास; नोकरी सोडलेला ड्रायव्हरच निघाला चोर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?