Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला केक कापून ‘एप्रिल फुल’ साजरा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला केक कापून ‘एप्रिल फुल’ साजरा

Surajya Digital
Last updated: 2022/04/01 at 8:20 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

● मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनांची करून दिली आठवण

पंढरपूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केक कापून आज एप्रिल फुल साजरा केला. पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदीची प्रतिमा लावून ‘मोदींजीच्या विकासाचा जन्मदिवस म्हणजेच एप्रिल फूल दिवस’ असे लिहून मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनांची आठवण करून दिली.

1 एप्रिलचा दिवस म्हणजे केवळ मनोरंजनाचा आणि कधीही न पूर्ण होणाऱ्या आश्वासनांचा दिवस म्हणून अनेकांना परिचित आहे व अनेकांनी तो अनुभवलेला ही आहे. याचीच प्रचिती म्हणून केंद्रातील मोदी सरकारने ज्या पध्दतीने सर्वसामान्यांना कधीही पूर्ण न होणाऱ्या स्वप्नांचे गाजर दाखवले व सत्तेवर येवून बसले आणि आता वरचेवर महागाईचा भस्मासूर वाढत असताना ही मुग गिळून बसलेल्या भाजप नेत्यांना त्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आजच्या दिवशी हा केक कापला.

यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सचिव श्रीकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, शहराध्यक्ष स्वप्नील जगताप यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर शहरात 1 एप्रिल निमित्त केक कापून अनोख्या पध्दतीने केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करून मोदीजींच्या विकासाचा जन्मदिवस म्हणजेच एप्रिल फुल दिवस साजरा करण्यात आला व सर्वसामान्यांना भाजपने दिलेल्या निवडणुकीतील आश्वासनांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला.

Nationalist Youth Congress celebrates April Fool’s Day by cutting a cake

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

यावेळी कार्यालयीन सचिव अरुण आसबे, जिल्हा उपाध्यक्ष बापू शिंदे तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, जिल्हा सचिव अतुल खरात, तालुका कार्याध्यक्ष बालाजी कवडे, सूरज गंगेकर,विशाल सावंत, सारंग महामुनी,यश महिंगडे, शुभम पवार, शाम पवार, विश्वजित व्यवहारे,मंगेश जाधव,अनुराग व्यवहारे,सुनील चव्हाण,विद्यार्थी संघटनेचे सागर पडगळ,प्रणव गायकवाड, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सचिव श्रीकांत शिंदे म्हणाले की, 350 रूपये गॅस सिलेंडर असताना विद्यमान केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी तत्कालीन कॉंग्रेस सरकारवर आगपाखड केली होती व  देशभरातील महिलांना जणू भाजप केंद्रात सत्तेवर आल्यानंतर गॅस सिलेंडर देखील स्वस्तात उपलब्ध करून देवू अशा भूलथापा मारल्या होत्या व भाजपच्या निवडणूक रणनितीप्रमाणे खोट्या आश्वासनांना बळी पाडले होते.

मात्र आज गॅस सिलेंडर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला असून नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार 1 हजार रूपयांच्या पुढे 1 टाकीसाठी पैसे मोजावे लागणार आहेत व विशेष म्हणजे कॉंग्रेसच्या काळात येणारी गॅस सबसिडी सुमारे 200 रूपयांवरून ही थेट आता 8 रूपयांवर आलेली आहे व गॅस सिलेंडरची किंमत वाढतच चाललेली आहे. पेट्रोल 115, डिझेल 100, खाद्य तेलाच्या 1 किलो 180 व विविध वस्तूंच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत याची जाण आता भाजप नेत्यांना राहिलेली नाही व सत्तेची धुंदी उरलेली नाही, अशा नेत्यांचा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात आला.

You Might Also Like

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

TAGGED: #Nationalist #Youth #Congress #celebrates #AprilFool'sDay #bycutting #cake #modi, #राष्ट्रवादी #युवक #काँग्रेस #केक #कापून #एप्रिलफुल #साजरा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विशाखा सुभेदारने ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ शो सोडला
Next Article ‘द काश्मिर फाईल्स’ला परवानगी देण्याची गरज नव्हती : शरद पवार

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?