सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.)।
गुजरातमध्ये भाजपसोबत काम करणाऱ्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपसोबत युती केली आहे. या नेत्यांचे काय करणार, असा सवाल काँग्रेसच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक मोहन जोशी यांनी काँग्रेस भवनात पक्ष बांधणीसाठी बैठक घेतली.
सलवदे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीबद्दल प्रश्न उपस्थित केले. माध्यमांतून या युतीबद्दल माहिती मिळत आहे. आम्हाला लोक याबद्दल प्रश्न विचारत आहेत. काय उत्तर देणार, असा सवाल त्यांनी केला.