सोलापूर, 21 एप्रिल (हिं.स.)।सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख यांनी उभा केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या पॅनलसाठी कंबर कसली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पॅनल मुळे नाराज काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्यांच्या घरोघरी जाऊन देशमुख हे भेटीगाठी घेत आहेत. यापूर्वीच त्यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांना सोबत घेतले आहे.सुभाष देशमुख यांनी आमदार विजयकुमार देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे, काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, काँग्रेसचे महादेव चाकोते, सिद्धाराम चाकोते, काँग्रेसचे जेष्ठ नेते जाफरताज पाटील त्यांच्या घरी जाऊन पाठिंबा घेतला आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी ही पाठिंबा दिला आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या राजवाडे चौकातील संपर्क कार्यालयात आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, बळीराम साठे, महादेव चाकोते, बाळासाहेब शेळके, सिद्धाराम चाकोते, डॉक्टर हवीनाळे, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांचे बराच वेळ गुप्त बैठक झाली. या बैठकीत बाजार समितीच्या निवडणुकीची व्यूव्हरचना ठरवण्यात आली आहे.———————