Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काँग्रेस-राष्ट्रवादीतला वाद निवळला? बाळासाहेब थोरात पवारांच्या भेटीला !
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

काँग्रेस-राष्ट्रवादीतला वाद निवळला? बाळासाहेब थोरात पवारांच्या भेटीला !

Surajya Digital
Last updated: 2021/06/07 at 12:50 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीतला तपशील अद्याप समोर आला नाही. मात्र, ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आम्हाला विश्वासात न घेता पदोन्नती आरक्षणाचा निर्णय घेतला, असा आरोप काँग्रेसचे मंत्री नितीन राऊतांनी केला होता. यामुळे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संबंध ताणले गेले आहेत.

महाराष्ट्राचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी आज आदरणीय शरद पवार साहेबांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.@PawarSpeaks @bb_thorat pic.twitter.com/dNLzcAADnW

— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 7, 2021

मागील आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात सुरू झालेला भेटीगाठींचा सिलसिला अद्याप सुरूच आहे. आता काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ट्वीटर हँडलवर दोन्ही नेत्यांच्या भेटीचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे. थोरात यांनी पवारांची सदिच्छा भेट घेतल्याचं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मात्र, या भेटीवरून पुन्हा एकदा वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले असतानाच फडणवीस यांनी मागील आठवड्यात अचानक शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतर फडणवीस थेट ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरी पोहोचले होते. फडणवीस यांच्या या भेटींमुळं चर्चा सुरू असतानाच, एकनाथ खडसे यांनी मुंबईतील निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली होती. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील यावेळी उपस्थित होते. त्यामुळं नेमकं काय चाललं आहे, याबाबत राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता.

"कोरोनाला रोखण्यासाठी हवन करा, मी रोज करते"; ड्रीमगर्ल, खासदार हेमा मालिनींचा खुलासाhttps://t.co/XBq8yjUQqy

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सध्या अनेक विषयांवरून कुरबुरी आहेत. निधी वाटपाविषयीची काँग्रेसची तक्रार जुनीच आहे. त्यातच पुढील विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. २०२४ साली राज्यात काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीतील पक्षांच्या अशा आक्रमक भूमिकेमुळे राज्यात वेगळा संदेश जात आहे. या पार्श्वभूमीवर थोरात यांनी घेतलेली पवारांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

ड्रीमगर्ल हेमा मालिनी कोरोनापासून वाचण्यासाठी करतायत दिवसातून दोनदा घरात होमहवन #हेमामालिनी #dreamgirl #HemaMalini #actresses #surajyadigital #सुराज्यडिजिटल #homehawan #होमहवन #कोरोना #coronavirushttps://t.co/JbSQnTytLr

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021

You Might Also Like

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

TAGGED: #Congress #NCP #disputesettled #BalasahebThorat #meets #Pawar!, #काँग्रेस #राष्ट्रवादीतला #वादनिवळला? #बाळासाहेबथोरात #पवारांच्या #भेटीला !
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “कोरोनाला रोखण्यासाठी हवन करा, मी रोज करते”
Next Article साडेतीन एकरामध्ये पसरलंय हे 300 वर्षाचे जुने अनोखे वडाचे झाड

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?