Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गांधी कुटुंबाच्या समर्थनासाठी दिग्गज मैदानात; काँग्रेसमधला वाढत चालला अंतर्गत कलह
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारणदेश - विदेश

गांधी कुटुंबाच्या समर्थनासाठी दिग्गज मैदानात; काँग्रेसमधला वाढत चालला अंतर्गत कलह

Surajya Digital
Last updated: 2020/08/24 at 5:59 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी राहुल गांधी यांनी स्वीकारली आणि अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गांधी-नेहरू घराण्याच्या बाहेरील व्यक्तीने आता अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी असे मत त्यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केले. काँग्रेस समितीने राहुल गांधींची ही भूमिका अमान्य केली. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या खांद्यावर पुन्हा नेतृत्वपदाची जबाबदारी आली.

आता वर्षभरानंतर प्रियंका गांधी यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा गांधी कुटुंब आणि अध्यक्षपदाची रखडलेली निवड याविषयीची चर्चा सुरू झाली. काँग्रेसने आपला मार्ग शोधावा असं म्हणत अध्यक्ष हा गांधी कुटुंबाबाहेरील असावा असं त्या म्हणाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस पक्षातले अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांची ‘यंग ब्रिगेड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांनी बंडाचा पवित्रा घेतला.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम-राम केला आणि ते भाजपमध्ये गेले. राहुल गांधींच्या जवळचे असणारे दुसरे नेते सचिन पायलट यांनीही आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राहुल गांधींचे अत्यंत जवळचे मानले जाणारे खासदार राजीव सातव यांनीही नव्या वादाला तोंड फोडलं.

ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार कुमार केतकर यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाच पक्षाचं नेतृत्त्व करण्याची विनंती केली आहे. त्यांनी ट्विटरवरून तसं मत व्यक्त केलं आहे.  “देशातील जुलूमशाहीविरोधात आणि घटनात्मक मूल्यांच्या संरक्षणासाठी कुणी ठामपणे उभं राहिलं असेल, तर ते म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधीच. आम्हाल माहित आहे तुम्ही अडचणींना तोंड देत आहात. मात्र, तरीही माझी प्रामाणिक विनंती आहे की, तुम्ही पक्षाचं नेतृत्त्व करत राहावं. इतर कुणाहीपेक्षा तुमच्या हातातच पक्ष सुरक्षित राहील,” असं कुमार केतकर यांनी मत मांडलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीनं प्रस्ताव मंजूर करत, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे. सोनिया गांधी यांनी पक्षाचं नेतृत्त्व करावं, मात्र त्यांनी नकार दिल्यास राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावं, असा प्रस्ताव मंजूर करत पक्षाच्या केंद्रीय समितीकडे पाठवला आहे.  दुसरीकडे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘कम बॅक, राहुल जी’ म्हणत राहुल गांधींना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे.

राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाब या राज्यांचे काँग्रेसचे मुख्यमंत्री अनुक्रमे अशोक गहलोत, भूपेश बघेल आणि कॅप्टन अमरिंदरसिंह यांनीही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाच जाहीर पाठिंबा दिलाय. अशोक गहलोत यांनी तर सोनिया गांधी यांना 23 नेत्यांनी पाठवलेल्या पत्राबाबत नाराजीही व्यक्त केलीय.

* वर्षभरात दोघांचीच नावे

केंद्रात सत्ताधारी भाजप पक्षाला हरवायचे असेल तर सर्वप्रथम काँग्रेसला सक्षम होणं गरजेचं आहे हे काँग्रेस नेत्यांनाही मान्य आहे. पण काँग्रेसमधला अंतर्गत कलह दिवसेंदिवस वाढत चालला आहे.  राहुल गांधी यांची अध्यक्षपदावर निवड करण्यासाठी काही काँग्रेस नेते आग्रही आहेत. गेल्या वर्षभरात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसच्या नेतृत्वपदासाठी एकही नाव समोर आलेले नाही.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

TAGGED: #काँग्रेस #दिग्गजनेते #समर्थनार्थ #कलह #राहुलगांधी #प्रियंकागांधी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राहुल गांधींच्या आरोपाने वरिष्ठ नेते चांगलेच भडकले; आरोप सिद्ध केल्यास राजीनामाच देण्याचे आव्हान
Next Article सोलापूर शहरात आज 118 जणांची मात; दोन मृत्यू तर नव्याने 34 रुग्णांची भर; कोरोनाबळी चारशे पार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?