Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आघाडीत बिघाडी… काँग्रेस-शिवसेनेच्या नव्या दोस्तीची सुरुवात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsब्लॉगमहाराष्ट्रराजकारण

आघाडीत बिघाडी… काँग्रेस-शिवसेनेच्या नव्या दोस्तीची सुरुवात

Surajya Digital
Last updated: 2023/04/20 at 1:23 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी मंगळवारी अत्यंत पोटतिडकीने आपल्या बंडाविषयीचा खुलासा राज्यापुढे केला. माझे जीवनमान असेपर्यंत मी राष्ट्रवादीतच राहाणार आहे. Disruption in the alliance… Congress-Shiv Sena’s new friendship begins Sanjay Raut Ajit Pawar Politics तसे हमीपत्र लिहून देवू का? असा सवाल त्यांनी न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधींपुढे बोलताना उपस्थित केला. इतके स्पष्ट बोलूनही त्यांच्याविषयीचा संभ्रम दूर झाला का? हा प्रश्न अजूनही ऐरणीवरच आहे. राजकीय पंडित मात्र त्यांच्या या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवायला तयार नाहीत असे दिसते. कारण राज्याच्या स्वप्नात नसतानाही अजितदादा यांनी राजभवनावर जावून देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकमेकांविरूद्ध बाहेर राजकारण कितीही पेटू दे पण तेच पेटते बोळे घरात पडू लागले तर घरही पेटायला उशीर लागत नाही.

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)✍️ ✍️ ✍️दैनिक सुराज्य, संपादकीय

 

अजितदादादांच्या या भूमिकेमुळे पवार फॅमिलीच्या घरात मोठा संघर्ष सुरू झाला. त्याचा त्रास शरदराव यांनाही सोसावा लागला. अखेर काकूंच्या आवाहनाला प्रतिसाद देवून दादांनी बदनामीची पर्वा न करता पुन्हा राष्ट्रवादीशी घरोबा केला. त्यामुळे सारा महाराष्ट्र आणि राजकीय पंडित त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. म्हणून संभ्रमाचे वातावरण कायम आहे. हे कमी म्हणून की काय? महाविकास आघाडीत बिघाडी होत चाललीय हे मात्र नक्की. त्याला कारण म्हणजे ठाकरे यांचे विश्वासू ज्येष्ठ पत्रकार संजय राऊत यांनी आगीत तेल ओतल्याची बाब समोर येते आहे. अजितदादांच्या बंडावर राऊतांनी सामनामधून लेख लिहिला आणि तिथूनच वादाला तोंड फुटले.

 

राऊतांच्या लेखामुळे मीडियाच्या अंदाजाला जणू पुष्टीच मिळाली. त्यामुळे मीडियाचा ससेमिरा अजितदादांच्या मागे लागला. या बंडाविषयी अजितदादांनीच खुलासा करावा, असे आव्हान राऊत यांनी त्या लेखामधून दिल्यानंतर अजितदादा जाम भडकले. मंगळवारी अजितदादांनी जो संताप व्यक्त केला, तो राऊतांवर नेम साधणारा होता. आमच्या पक्षाची वकिली कुणीही करू नये, अशा शब्दात अजितदादांनी निशाणा साधल्यानंतर राऊतांचे पित खवळणे साहजिकच आहे. राऊतांनी बुधवारी अजितदादांच्या विधानाला सडेतोड उत्तर दिल्याने राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांच्यात संघर्षाची ठिणगी पडणार, असे दिसते.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

सत्य बोलल्यामुळे जर आपल्याला कोणी टार्गेट करत असेल तर आपण मागे हटणार नाही. मी सत्य बोलतच राहणार, मी कोणाच्या बापाला घाबरत नसल्याचे राऊत म्हणाले. आघाडीत मोठा पक्ष असताना व्यासपीठांवर अजितदादांना दुय्यम स्थान. त्यात बोलू द्यायचे नाही. ही खदखद अजितदादांच्या मनात रूतून बसलीय, यात शंकाच नाही. आता राऊतांनी थेट आव्हानच दिल्याने आता अजितदादा स्वस्थ बसतील असे वाटत नाही. हे भांडण काँग्रेसच्या पथ्यावर पडणार, असे दिसते. हीच संधी साधून काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला गेल्यामुळे काँग्रेस ठाकरे गट यांच्या जवळिकता वाढत असल्याचे संकेत आहेत.

 

सावरकरांच्या मुद्यावरून काँग्रेस व शिवसेना यांच्यात काहीसे ताणले गेलेले संबंध वेणुगोपाल ठाकरे भेटीने पूर्वत झाल्याचा संदेश दिला गेला आहे. राहुल गांधी यांनी अदानी घोटाळ्याचा मुद्दा उपस्थिती करून सत्ताधारी भाजपला घाम फोडला. त्याचवेळी शरद पवार यांनी वेगळाच सूर लावल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या एकोप्याला तडे जातायत की काय, अशी चर्चा सुरू झाली. परंतु या मुद्यावर काँग्रेसनेही सबुरीची भूमिका घेतली आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी पवारांऐवजी राहुल गांधी यांच्या भूमिकेचे जाहीरपणे समर्थन केले. काँग्रेस व शिवसेनेला जवळ आणण्याचा हा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. दुसरा मुद्दा म्हणजे सावरकर मुद्यावरून काँग्रेस व शिवसेनेचे बिनसले असले तरी, हिंदुत्वाच्या विचारसणीची मक्तेदारी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर काँग्रेस विशेषतः राहुल गांधी जेवढा तीव्र हल्ला चढवितात, तसाच वर्मावर घाव घालणारा हल्ला उद्धव ठाकरेही संघावर चढवतात इतकी सडतोड भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस कधीच – घेत नाही.

 

भाजप व शिवसेनेचा वाद खरोखरच टोकाला गेला आहे, त्यामुळे एवढ्यात त्यांच्यात दिलजमाई होईल, असे वाटत नाही, तर काँग्रेसला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करायचे आहे, त्यासाठी शिवसेनेला सोबत ठेवणे आवश्यक वाटते. त्यामुळेच सावरकरांचा मुद्दा फार ताणून न धरता तो सोडून देऊन शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस शिवसेनेच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, अशी ग्वाही वेणुगोपाल यांनी देणे आणि आम्ही दोस्ती निभावतो, ती एका नात्यासारखी असे ठाकरे यांनी वचन देणे हे भविष्यातील राजकीय वाटचालीतील काँग्रेस-शिवसेनेच्या नव्या दोस्तीची सुरुवात असल्याचे मानले जात असले तरी राऊत अजितदादा यांच्या संघर्षातून आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

✍️ ✍️ ✍️

दैनिक सुराज्य, संपादकीय

You Might Also Like

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी

अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात

लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ

TAGGED: #Disruption #alliance #Congress #ShivSena's #new #friendship #begins #SanjayRaut #AjitPawar #Politics, #आघाडी #बिघाडी #काँग्रेस #शिवसेना #नव्या #दोस्ती #सुरुवात #आदित्यठाकरे #अजितपवार #संजयराऊत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भूषण पुरस्कार सोहळ्यात खरे सांगा किती जणांचा मृत्यू झाला ? दुर्घटनेतून घेतला बोध अन् शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Next Article स्वतंत्र गट; वेगळाच कट, फोडाफोडी रोखण्यासाठी राष्ट्रवादीची खटपट

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?