मुंबई, 1 ऑगस्ट।
राज्यातील भाजपा युती सरकार हे “बेशरम आणि लाचार” आहे. विधानसभेत रमी खेळणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा न घेता त्यांनाच क्रीडा मंत्रालय देऊन सन्मान केला गेला. “कदाचित पुढे रमीला ऑलिंपिक दर्जा देतील आणि त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारही देतील,” असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चढवला.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती या निमित्ताने सपकाळ यांनी अभिवादन केले.
मालेगाव प्रकरणावर टीका
सपकाळ म्हणाले –
-
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने निकाल ३१ जुलै रोजी दिला असला तरी “खरा निकाल गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत एक दिवस आधीच दिला होता.”
-
दहशतवादाला धर्म वा रंग नसतो, पण भाजपा दहशतवादाला रंग देऊन अजेंडा राबवत आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटारडेपणा आणि दुटप्पीपणाचे आरोप करत त्यांनी शपथेचा भंग केला असल्याचे म्हटले.
लाडकी बहीण योजनेवरील टीका
-
सामाजिक व आदिवासी विभागाचा निधी या योजनेसाठी वळवणे हे संविधानाचे उल्लंघन आहे.
-
“हे सरकार चुकीच्या पद्धतीने सत्तेत आले आहे, त्यामुळे चुकीचीच कामे करणार,” असा आरोप त्यांनी केला.
पक्ष सोडून जाणाऱ्यांबद्दल मत
-
“ज्यांना सौदा मिळाला ते गेले, ही गळती नाही. काँग्रेस हा विचारांचा पक्ष आहे. कोणाच्या जाण्याने पक्ष कमजोर होत नाही. ५०-५० वर्षे एकाच कुटुंबात पदे होती, आता नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळत आहे,” असे सपकाळ म्हणाले.
-
“जे गेले त्यांनी दिल्या घरी सुखी रहावे,” अशी शुभेच्छाही त्यांनी दिल्या.