मुंबई : काँग्रेसने रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. मुंबईतील काँग्रेस कार्यकर्ते, नेते मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहेत. तसेच अर्णब यांच्या अटकेची मागणी करणार आहेत. भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णब गोस्वामी यांच्याकडे तीन दिवस आधीच कशी पोहचली? असा सवाल काँग्रेसने केला आहे.
भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णब गोस्वामी यांच्याकडे तीन दिवस आधीच कशी पोहचली? अर्णब आणि पार्थोदास गुप्तासोबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे. याविरोधात केंद्र सरकारने काहीच पाऊले न उचलल्याने काँग्रेसने आता मोठा निर्णय घेतला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबईतील काँग्रेस कार्यकर्ते, नेते मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहेत. तसेच अर्णब यांच्या अटकेची मागणी करणार आहेत. मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनी शनिवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही घोषणा केली आहे.
जगताप यांनी सांगितले की, अर्णब गोस्वामी हे मुंबई पोलिसांपासून वाचण्यासाठी दिल्लीमध्ये बस्तान हलविले आहे. जर मुंबईच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला तर मुंबई पोलिसांवर त्यांना दिल्लीतून अटक करून आणण्यासाठी दबाव वाढेल. सोमवारपासून गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. मी आणि कार्याध्यक्ष चरणजीत सिंह सप्रा सोमवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गोस्वामींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहोत.
* बालाकोट सर्जिकल स्ट्राइक माहिती बाहेर कशी पडली
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अत्यंत गोपनीय पध्दतीने केंद्र सरकार व भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून लष्करी कारवाईची अर्थात बालाकोट सर्जिकल स्ट्राइकची माहिती थेट रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी यांच्यापर्यंत कशी पोहचली आणि त्यांनी याबाबत ‘बार्क’चे माजी सीईओ पार्थाे दासगुप्ता यांच्याशी याबाबत संवाद साधत माहितीची देवाणघेवाण केल्याचेही पुढे आले आहे. एकूणच ‘टीआरपी’ घोटाळ्याच्या तपास आता वेगळ्या वळणावर येऊन पोहचला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी सुरु आहे.