अमरावती, 31 मार्च (हिं.स.)
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा शुभारंभाचा मंगल प्रसंग आहे,जो आपल्या जीवनात नवचैतन्य, समृद्धी आणि एकतेचा संदेश घेऊन येतो.या शुभदिनी,अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस भवन,नवीन इमारत शिवटेकडीच्या बाजुला,अमरावती येथे गुढी उभारणीचा भव्य आणि पवित्र सोहळा शहराध्यक्ष बबलु शेखावत यांच्या हस्ते गुढीची पूजा करून तसेच जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर,माजी पालकमंत्री डॉ.सुनील देशमुख,माजी महापौर विलास इंगोले,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष भैय्याजी पवार,महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला.
हा कार्यक्रम केवळ नववर्षाचे स्वागतच नाही,तर काँग्रेस पक्षाच्या जनसेवेच्या अखंड परंपरेचा आणि समाजाप्रती असलेल्या अतूट बांधिलकीचा उत्सव आहे.काँग्रेस पक्ष हा नेहमीच देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ राहिला आहे.स्वातंत्र्य संग्रामापासून ते आजच्या आधुनिक भारताच्या उभारणीपर्यंत,काँग्रेस पक्षाने सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देत जनतेच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. गरिबांचे आंसू पुसणे, शेतकऱ्यांना बळ देणे,तरुणांना संधी उपलब्ध करून देणे आणि प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देणे, हे काँग्रेसचे ध्येय राहिले आहे.
गुढीपाडव्याच्या या मंगल प्रसंगी, काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि नव्या संकल्पांसह पुढे जाण्यासाठी कटिबद्ध आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकी मध्ये जे काही घडले हे सर्व विसरून मराठी नववर्षाच्या शुभारंभ प्रसंगी म्हणजेच गुढीपाडव्या निमित्त अमरावती शहरातील जनतेच्या प्रत्येक समस्या सोडविण्याकरिता व शहरातील नागरिकांना नागरिकांचे हक्क मिळवून देण्याकरिता अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी पुढाकार घेणार आहे.
मागे घडलेले सर्व प्रसंग विसरून सर्व जुन्या गोष्टी मागे टाकून अमरावती शहरात काँग्रेस पक्ष एक नंबर वर आणु व महाराष्ट्रात देखील अमरावती उदाहरण घेऊन काँग्रेस पक्ष सर्वोच क्रमांकावर आणू याचा निर्धार यावर्षी गुढीपाडव्या निमित्त अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी द्वारे करण्यात आला आहे.अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस पक्षा तर्फे समस्त अमरावतीकरांना मराठी नुतन वर्ष व गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देत गुढी उभारू समृद्धीची,गुढी उभारु आनंदाची, गुढी उभारू सर्वधर्मसमभावाची काँग्रेस पक्षाच्या या प्रेरणादायी आणि जनकल्याणकारी कार्याला समस्त अमरावतीकरांच्या सहभागाने नवीन ऊर्जा मिळावी आणि नववर्षाच्या या नव्या सुरुवातीला एकता,प्रगती आणि समृद्धी लाभावी असा संकल्प करण्यात आला.