Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लोकसभेला उमेदवारी नाकारली तर अन्य पर्यायचा विचार करू; महादेव जानकरांचा इशारा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

लोकसभेला उमेदवारी नाकारली तर अन्य पर्यायचा विचार करू; महादेव जानकरांचा इशारा

Surajya Digital
Last updated: 2023/01/11 at 9:26 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ जिल्हा नियोजनच्या माजी सदस्यावर विनयभंगाचा गुन्हा

पंढरपूर : एनडीएने मला लोकसभेला उमेदवारी नाकारली तर अन्य पर्यायांचा जरूर विचार करु असं जानकर यांनी पंढरपुरात स्पष्ट केलं आहे. रासपच्या पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यासाठी आज महादेव जानकर पंढरपुरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपला हा इशारा दिला आहे. जानकर यांनी पुन्हा भाजपला डिवचले आहे. If the Lok Sabha candidature is rejected, we will consider another option; Mahadev Jankar’s warning to Pandharpur BJP

राष्ट्रीय समाज पक्षाला सोबत घेतल्याशिवाय राज्यातील व केंद्रातील एनडीएचे सरकार बनणार नाही. आगामी 2024 च्या आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रासपने तसा बंदोबस्त केला आहे, असा सूचक इशारा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपला दिला आहे.

रासप पक्ष सध्या सर्वत्र पक्ष वाढीसाठी काम करत आहे. आम्ही डिमांड करणारे नव्हे तर कमांड मिळवणारे होत आहोत. त्यामुळे 2024 साली आम्हाला विचारात घेतल्याशिवाय एनडीए चे सरकार बनणार नाही. यांची आम्ही काळजी घेऊ. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती , परभणी आणि माढा या तीन मतदारसंघावर आपले लक्ष आहे. एनडीएने आपली उमेदवारी नाकारली तर आपण निवडणूक लढणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

 

पंकजाताई मुंडे यांच्या मागे आपण एक भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी राहू , मात्र त्यांच्या नाराजी बद्दल भाजप योग्य तो निर्णय घेईल, अशी सावध प्रतिक्रिया दिली. रासपचे पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष पंकज देवकते, कुमार सुशिल, ॲड. संजय माने, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव माऊली सलगर, आबा मोटे, महाळाप्पा खांडेकर,संजय लवटे, रणजित सुळ आदी उपस्थित होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

□ जिल्हा नियोजनच्या माजी सदस्यावर विनयभंगाचा गुन्हा

पंढरपूर : आमच्या शेतामधून वाहने का घेऊन जाता अशी विचारणा करणाऱ्या महिलेस जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष सुळे व त्याच्या मेव्हण्याने जबर मारहाण केली असून याप्रकरणी मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिलेची तालुक्यातील ईश्वरवठार येथे शेती असून सोमवारी सदर महिला आपल्या शेतात काही कामानिमित्त गेली होती. यावेळी सदर महिलेने संतोष सुळे याच्या शेतातील गड्यास तुम्ही आमच्या शेतामधून न विचारता वाहने का घेऊन जाता असे विचारले. यावेळी संतापलेल्या संतोष सुळे याने या महिलेस लाथा बुक्क्याने मारहाण केली तसेच मनाला लज्जा वाटेल, असे कृत्य केले. तर त्याचा मेव्हणा बाळू गावडे याने देखील पीडित महिलेस मारहाण करून सदर तिचा मोबाईल जमिनीवर आपटून नुकसान केले.

संतोष सुळे व बाळू गावडे यांच्या विरोधात मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

You Might Also Like

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण

उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन

केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी

‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा

हिमाचल प्रदेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; ४४ प्रवासी जखमी

TAGGED: #LokSabha #candidature #rejected #consider #option #MahadevJankar's #warning #Pandharpur #BJP, #लोकसभा #उमेदवारी #नाकारली #अन्य #पर्याय #विचार #महादेवजानकर #इशारा #पंढरपूर #भाजप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात विधवा भगिनींचा हळदी कुंकू लावून, संक्रांतीचे वाण देऊन सन्मान
Next Article हुतात्मा दिन | चार हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?