Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटके आढळणे हे घडवून आणलेले षडयंत्र
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटके आढळणे हे घडवून आणलेले षडयंत्र

Surajya Digital
Last updated: 2021/02/27 at 10:43 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके आढळणे हे घडवून आणलेले षडयंत्र असल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अंबानी आणि अदानी हे शेतकऱ्यांच्या, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्याही रोषाला पात्र ठरले आहेत. स्फोटकांचे प्रकरण घडवून आणल्याने आपल्याला सहानुभूती मिळेल असे त्यांना वाटत आहे. मात्र असे काहीही रोणार नाही, असे शेट्टी म्हणाले.

माजी खासदार राजू शेट्टी हे पुण्यातील एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सीबीआयचा राजकीय वापर होत असल्याचे सांगत सरकारवर निशाणा साधला. सीबीआयने राजकीय कामांकडे लक्ष देत राहण्यापेक्षा ही स्फोटके आली कुठून, याचा शोध घेण्याची गरज आहे, असेही शेट्टी म्हणाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यांनी केंद्रीय कृषी कायद्यावर देखील भाष्य केले आहे. केंद्रीय कृषी कायद्यांचा फटका हा शेतकऱ्यांना तर बसणार आहेच. पण तो सर्वसामान्य नागरिकांना देखील बसणार असल्याचे शेट्टी म्हणाले. या कृषी कायद्याचे लाभधारक १५ ते १६ जण असल्याचेही ते म्हणाले. अशा लाभधारकांपैकी अदानी आणि अंबानी हे पुढे आले आहेत. मात्र दोघांपैकी एक असलेल्या अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके आढळली. मात्र, यावरून हे घडवून आणले गेले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे शेट्टी म्हणाले.

अशा प्रकारची स्फोटके मुंबईत येत असताना गुप्तचर यंत्रणा काय करत होती?, मुंबई पोलिस काय करत होते?, केंद्रीय यंत्रणा काय करत होत्या?, असे एकावर एक प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केले आहेत. आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी आणि केंद्रीय गुप्तचर विभागाने द्यावीत, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

TAGGED: #conspiracy #explosives #houseofindustrialist #ambani #rajushetti, #मुकेशअंबानी #घराजवळ #स्फोटकेआढळणे #घडवूनआणलेले #षडयंत्र
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article खून प्रकरणी पोलिसांनी चक्क कोंबड्याला घेतले ताब्यात
Next Article भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?