Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पोलीस आयुक्तालयात हृदयविकाराचा झटका येऊन कॉन्स्टेबलचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पोलीस आयुक्तालयात हृदयविकाराचा झटका येऊन कॉन्स्टेबलचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2021/10/07 at 12:58 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहर पोलिस मुख्यालयातील कॉन्स्टेबल संजय सावरे यांना काल बुधवारी आयुक्तालयातील पोर्चमध्ये हृदयविकाराचा झटका आला. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले. ही दुर्दैवी घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली.

मृत पोलिस कॉन्स्टेबल संजय सावरे हे आयुक्तालयात ड्रिल मास्टर म्हणून कार्यरत होते. पोलिस भरती झालेल्या नवीन मुलांना ते ड्रिल शिकण्याचे प्रशिक्षण देत होते. त्यामुळे सर्वजण त्यांना मास्तर म्हणूनच ओळखत होते. त्यांच्याकडे पोलिस मुख्यालयातील पोलिसांच्या घरांची देखभाल व सफाई कामगार यांच्यावर लक्ष ठेवून काम करून घेण्याचे काम होते.

काल बुधवारी मास्टर सावरे हे कामानिमित्त पोलिस आयुक्तालयात आले होते. त्यांचे काम झाल्यावर दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ते आयुक्तालयातील पोर्चमधील माहिती कक्षाच्या समोर आले. चालतानाच त्यांना अचानक हृदविकाराचा तीव्र झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले. तत्काळ तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना पोलिस गाडीतून खासगी रूग्णालयात दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी संजय सावरे यांना मृत घोषित केले.

* पाच जणांनी मारहाण करून एकास लुटले

सोलापूर : हॉटेलमध्ये जेवण करत असताना एका काळ्या रंगाच्या वाहनांमधून आलेल्या पाच जणांनी एकास मारहाण करीत लूटमार केल्याची घटना ५ ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वशिम भाईजान यांच्या हॉटेल समोरील मार्केट यार्ड सोलापूर येथे घडली.

याप्रकरणी फारूक करीम शेख (वय-४०,रा.मित्र नगर,शेळगी,हैदराबाद रोड,सोलापूर) यांनी जेल रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून कृष्णा चेकीला (रा.शांती नगर,सोलापूर),अंकुश ओंकार फुलसे उर्फ गदर (रा.जुने घरकुल,सोलापूर),गोट्या उर्फ प्रथमेश प्रेम कन्ना (रा.कन्ना चौक, सोलापूर) छोट्या (पत्ता माहीत नाही) व अनोळखी एक इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

फिर्यादी व त्यांचा मित्र इरफान बाबा शेख असे दोघे मिळून हॉटेल वसिम भाईजान समोर बसून जेवण करत होते. त्यावेळी अचानकपणे एका मारुती वाहनमधून हे आरोपी वाहनाच्या खाली उतरून फिर्यादी फारुक शेख यांना तुझ्याजवळ किती पैसे आहेत ते आत्ताच्या आत्ता काढून दे नाहीतर बघ असे म्हणून धमकी देऊन तोंडावर चपलेने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.

त्यानंतर फिर्यादी यांच्याकडील आठशे रुपये व हातातील अठराशे रुपये किमतीची मनगटी घड्याळ जबरदस्तीने काढून घेऊन मारुती गाडी मधून निघून गेले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद जेल रोड पोलिस ठाण्यात झाली असून,याचा पुढील तपास पोसई शेख हे करित आहे.

* महिलेचा गळा दाबून तोंडात बळजबरीने पाजले विष

सोलापूर : जामीन मंजूर होऊ नये यासाठी न्यायालयात अर्ज का केला? या कारणावरून एका महिलेचा गळा दाबून तिच्या तोंडात बळजबरीने विष पाजल्याची घटना न्यायालयात समोरील वैद्यकीय महाविद्यालय जवळ बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.

ती ३५ वर्षीय महिला काल मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास न्यायालयातून बाहेर येऊन पायी घराकडे निघाली होती. त्यावेळी  काशिनाथ बुरुबुरे आणि त्याच्या साथीदाराने तिला वाटेत अडविले. आणि तू जामीन नामंजूर होण्याकरिता अर्ज का केली, असे म्हणून तिचा गळा दाबून तोंडात विषारी द्रव ओतले. त्यानंतर ती महिला स्वतः उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाली. या घटनेची नोंद जेलरोड पोलिस झाली आहे .

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Constable #dies #heartattack #PoliceCommissionerate, #पोलीस #आयुक्तालय #हृदयविकार #झटका #कॉन्स्टेबल #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बायकोला नांदायला पाठवत नसल्याने नव-याने घेतला मेहुण्याचा चावा
Next Article पहाटे भीषण बस अपघात, १३ ठार, २५ गंभीर जखमी

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?