Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पोलिस वसाहतीत सशस्त्र दरोडा; हवालदाराला मारहाण करून चार लाखाचे दागिने पळवले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पोलिस वसाहतीत सशस्त्र दरोडा; हवालदाराला मारहाण करून चार लाखाचे दागिने पळवले

Surajya Digital
Last updated: 2021/09/14 at 9:10 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : अकलूज येथील पोलीस वसाहत तसेच मसूदमळा परिसरात सशस्त्र चोरट्यांनी दरोडा टाकून रोख रकमेसह ५ लाखाचे दागिने लुटून नेले. ही घटना काल सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या मारहाणीत अकलूज पोलिस ठाण्याचे हवालदार अमोल बापूसाहेब मिरगणे (वय३६) हे जखमी झाले. हवालदार मिरगणे हे बंदोबस्तासाठी बाहेर गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घरातच दरोडा टाकला.

अकलूज येथील वसंत विहार पोलीस वसाहत येथे अमोल मिरगणे हे हेडकॉन्स्टेबल रूम नंबर ५५ येथे राहण्यास आहेत. त्यांच्या घरातील मंडळी गौरीच्या सणानिमित्त गावाला गेले होते. त्यामुळे ते घराला कुलूप लावून ड्युटीवर गेले होते. ड्युटी आटोपून ते पहाटे ३ वाजेच्या  सुमारास ते घरी परतले होते. त्यावेळी त्यांचे घर उघडे दिसले, आणि आत ४ अनोळखी इसम उचकाउचकी करीत होते. त्यांनी विचारणा केली असता दरोडेखोरांनी त्यांना कोयता, कटावणी आणि दगडाने मारहाण करून किरकोळ जखमी केले.

त्यांच्या कपाटातील ३० हजार रुपये रोख आणि ११५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ९० हजाराचा ऐवज लुटून पोबारा केला. या घटनेची फिर्याद अमोल मिरगणे यांनी अकलूज पोलिसात दाखल केली. पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

याच सुमारास मसूद मळा परिसरात राहणारे लालसाहेब निवृत्ती मोरे यांच्या घरावर देखील  चोरट्यांनी दरोडा टाकून एक लाखाची रोकड लुटून नेली. मोरे हे घरात झोपले होते. त्यावेळेस चौघां दरोडेखोरांनी लोखंडी गेट तोडून हॉलमध्ये प्रवेश केला. त्यांना सत्तूरने मारण्याची धमकी देऊन, १ लाखाची रोकड लुटून पोबारा केला. याची नोंद देखील अकलूज पोलिसात झाली. पोलीस निरीक्षक सुगावकर आणि फौजदार जगताप हे पुढील तपास करीत आहेत.

* कोंडी ब्रिज येथे अपघात, दुचाकी चालक ठार

सोलापूर : पुणे महामार्गावरील कोंडी येथील ब्रिजवर वेगाने जाणारी दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकल्याने अतुल नागनाथ माने ( वय २९ राहणार शिंगोली, तालुका मोहोळ) हे गंभीर जखमी होऊन मरण पावले. हा अपघात आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडला. ते दुचाकीवरून पुणे ते सोलापूर असा प्रवास करीत होते. कोंडी ब्रिजजवळ पहाटे हा अपघात घडला. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वीच मयत झाले. अशी प्राथमिक माहिती तालुका पोलिसात झाली आहे .

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Armed #robbery #police #colony #constable #jewelery, #पोलिस #वसाहतीत #सशस्त्र #दरोडा #हवालदाराला #मारहाण #दागिने #पळवले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजप नेते संजय क्षिरसागरांना दिलासा, दाखल तक्रार निकालात काढली
Next Article भर रस्त्यात तरूणीला मिठीत घेत डिलिव्हरी बॉयने केला किस करण्याचा प्रयत्न

Latest News

Gentle Monster Jennie Kpop Sunglasses Up to 30% Off
Top News December 6, 2025
test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?