Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कंटेनर – रिक्षाच्या धडकेत सातजणांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

कंटेनर – रिक्षाच्या धडकेत सातजणांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी

Surajya Digital
Last updated: 2022/05/06 at 4:49 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

अहमदनगर :  येथे नागपूर मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून 4 गंभीर जखमी आहेत. कोपरगाव तालुक्यातील डाऊच शिवारात कंटेनरची रिक्षाला धडक बसल्याने अपघात झाला आहे. सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. Container – Seven killed, 4 seriously injured in rickshaw collision

या धडकेत सात जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महाविद्यालयीन तरुणी, तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. अपघातानंतर गाडीसह पसार झालेल्या कंटनेर चालकाला नागरिकांनी पकडू पोलिसांच्या ताब्यात दिलं. दर्शन सिंह असं कंटेनर चालकाचं नाव असून तो लुधियाणा इथला रहिवासी आहे.

कंटेनरने समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला कट मारुन प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. रिक्षातून प्रवास करणाऱ्या कॉलेजच्या दोन विद्यार्थिनी, दोन महिला आणि दोन पुरुषांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एका जखमी महिलेचे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. रिक्षातील प्रवाशांसह मोटारसायकलवरील तिघे असे एकूण सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.

या कंटेनरने दोन मोटरसायकलस्वारांना देखील चिरडले आहे. ते देखील गंभीर जखमी झाल्याचे समजते. दरम्यान या घटनेनंतर परिसरात गर्दी जमली होती. नागरिकांनी त्वरित त्याठिकाणी मदतकार्य केली.

 

राजाबाई साहेबराव खरात (वय 60वर्षे रा. चांदेकसारे), आत्माराम जम्मानसा नाकोडे (वय 65 वर्षे रा. वावी), पूजा नानासाहेब गायकवाड (महाविद्यालयीन विद्यार्थिनी, वय 20 वर्षे रा. हिंगणवेढे), प्रगती मधुकर होन (महाविद्यालयीन विद्यार्थिनी, वय 20 वर्षे रा. चांदेकसारे), शैला शिवाजी खरात (वय 42 वर्षे रा.श्रीरामपूर) शिवाजी मारुती खरात (वय 52 वर्षे, रा. श्रीरामपूर) , रुपाली सागर राठोड (वय 40 वर्षे रा. सिन्नर) असे सात मृतांची नावे आहेत.

https://www.facebook.com/109399567404448/posts/535141901496877/

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

विलास साहेबराव खरात (वय 34 वर्षे रा. चांदेकसारे), कावेरी विलास खरात (वय 5 वर्षे, रा चांदेकसारे), धृव सागर राठोड (वय 17 वर्षे, रा.सिन्नर) मोटारसायकलवरील जखमी, मोटार सायकलवरील दिगंबर चौधरी (वय 42 वर्षे), त्यांचा मुलगा सर्वेश दिगंबर चौधरी (वय 12 वर्षे), बहीण कृष्णाबाई गोविंद चौधरी (वय 42 वर्षे, रा. पोहेगाव) अशी जखमींची नावे आहेत.

 

□ अहमदनगरमध्ये तरुणाची हत्या 

अहमदनगमधील देवगाव शिवारात तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. योगेश भास्कर भालेराव (वय 27) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

योगेश भास्कर भालेराव (वय 27) हा शेंडीला जात असताना त्याला रस्त्यात अडवून रमेश दत्तू जाधव व मधुकर दत्तू जाधव यांनी देवगाव शिवारात मारुन टाकल्याची फिर्याद राजूर पोलिस ठाण्यात दिली आहे. मयत मुलाचे वडील भास्कर संतू भालेराव यांनी सदर फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीवरून राजूर पोलिसांत भा.द.वि.कलम 302,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी ही पोलिसांसमोर आव्हान बनत चालली आहे. चोरी , दरोडे आदी घटनांनी नागरिक आधीच त्रस्त असतानाच आता हत्येसारख्या घटना घडू लागल्याने नागरिकही चिंतेत असल्याचे वृत्त आहे.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/535139741497093/

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Container #Seven #killed #seriously #injured #rickshaw #collision, #कंटेनर #रिक्षा #धडक #सातजण #मृत्यू #गंभीर #जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारतात कोरोनाने 47 लाख लोकांचा मृत्यू झाला, WHO चा वेगळाच दावा, भारताने घेतला आक्षेप
Next Article fundamental right मशिदीत लाऊडस्पीकर लावणे हा मूलभूत अधिकार नाही : हायकोर्ट

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?