Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ठेकेदाराच्या जीवावर मनपा अधिकाऱ्यांची ऐश कशाला ? माजी नगरसेवकांचा नाराजीचा सूर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

ठेकेदाराच्या जीवावर मनपा अधिकाऱ्यांची ऐश कशाला ? माजी नगरसेवकांचा नाराजीचा सूर

Surajya Digital
Last updated: 2023/06/07 at 3:32 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

● शहरात उलट-सुलट चर्चा, माजी नगरसेवकांचा नाराजीचा सूर

सोलापूर : उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामावर नियंत्रण आणि निगराणी करण्याच्या उद्देशातून पोचमपाड कंपनीने स्मार्ट सिटीच्या सीईओ तथा महापालिका आयुक्त आणि इतर अधिकारी यांना अलिशान २ गाड्या दिल्या. Why are the municipal authorities interested in the life of the contractor? The tone of displeasure of former corporators is municipal parallel water channel महापालिका आयुक्तांना महापालिकेची गाडी उपलब्ध असताना मक्तेदार कंपनीने दिलेली अलिशान गाडी वापरावी का?, यावरून आता उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. माजी नगरसेवकांसह अनेकांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.

अनेक वर्षानंतर उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम अखेर अनेक विघ्न पार पाडत सुरू झाले. सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन व महापालिका यांच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे. जुना मक्तेदार असलेल्या पोचमपाड कंपनीलाच नाट्यमयरित्या पुन्हा या कामाचा मक्ता देण्यात आला. वर्क ऑर्डर दिल्यानंतर या कंपनीने जॅकवेलसह जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. ११० किलोमीटरचे समांतर जलवाहिनीचे काम आहे.

दरम्यान, सोलापूर स्मार्ट सिटीच्या सीईओ तथा महापालिका आयुक्त आणि मुख्य तांत्रिक अधिकारी व पथकाकडून या कामाची वेळोवेळी नियमितपणे पाहणी व नियंत्रण करण्यात येणार आहे. त्यासाठी पोचमपाड कंपनीने महापालिका आयुक्तांसाठी इनोव्हा क्रीस्टा तर मुख्य तांत्रिक अधिकारी व पथक यांच्यासाठी स्कॉर्पिओ अशा दोन गाड्या दिल्या आहेत. या जलवाहिनीचे काम संपेपर्यंत या गाड्या महापालिका अधिकाऱ्यांच्या दिमतीला राहणार आहेत.

 

दरम्यान, पोचमपाड कंपनीकडून स्मार्ट सिटी सीईओ तथा महापालिका आयुक्तांसाठी अलिशान इनोव्हा क्रिस्टा गाडी तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यासाठी दिलेली आहे. सोमवारी महापालिका आवारात ही गाडी पहावयास मिळाली.  दुहेरी जलवाहिनीच्या कामाच्या निगराणीसाठी ही गाडी दिली असली तरीही दुसरीकडे माजी नगरसेवकांमधून व पदाधिकाऱ्यांमधून या संदर्भात उलट सुलट चर्चा होत आहे. – नाराजीचा सूरही उमटत आहे.

 

यापूर्वी पोचमपाड कंपनीने हेच दुहेरी जलवाहिनीचे काम हाती घेतले असताना तत्कालिन सीईओ अथवा महापालिका आयुक्तांनी कंपनीची गाडी वापरली नव्हती. तांत्रिक अधिकाऱ्यांना या गाड्या दिल्या जातात. आयुक्त यांना महापालिकेच्या ताफ्यातील गाडीची सुविधा उपलब्ध आहे, असे असताना एखाद्या मक्तेदार कंपनीकडून देण्यात आलेली अलिशान अशी गाडी आयुक्तांनी वापरावी का? या संदर्भातही नाराजीचा सूर उमटत आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》 हा सर्व मिलीभगतचा प्रकार आहे : चेतन नरोटे

सर्व भ्रष्ट्राचाराने फोफावले आहे. हा मिलीभगतचा प्रकार वाटत आहे. दुहेरी जलवाहिनीसाठी ४५० कोटीचे टेंडर पूर्वीच निघाले होते. मात्र हे सरकार टेंडर काढतात आणि पैसे खातात असा प्रकार सुरू आहे. अधिकाऱ्यांना गाड्या देणे म्हणजे भ्रष्टाचार असल्याचे वाटत आहे. पाणीपुरवठा विस्कळीत आहे, मात्र त्यासाठी महापालिकेचे प्रयत्न नाहीत, जे सत्य आहे ते लोकांसमोर येईल, असे काँग्रेसचे माजी नगरसेवक चेतन नराटे म्हणाले.

》 अधिकाऱ्यांना खूष करण्यासाठीच : खरादी

पोचमपाड कंपनीचा मक्ता रद्द केला होता. मात्र आर्थिक व्यवहारातून पुन्हा त्याच कंपनीला मक्ता देण्यात आला हे भ्रष्ट्राचारच आहे. या टेंडरची चौकशी झाली आहे. अधिकाऱ्यांना खूष करण्यासाठी कंपनीने गाड्या दिल्या आहेत, अधिकाऱ्यांना गाड्या आहेत, मग गाड्या का दिल्या, यामागे काहीतरी मॅनेज आहे, असे एमआयएमचे माजी नगरसेवक रियाज खरादी म्हणाले.

》 नको त्याच गोष्टी पालिकेत : आनंद चंदनशिवे

 

यापूर्वी रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने अधिकाऱ्यांना गाडी दिली होती. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही, नाही त्याच गोष्टीसाठी गाड्याचा वापर झाला. आज प्रभागात निधी नाही, पाणीपुरवठा विस्कळीत आहे. त्याकडे दुर्लक्ष आहे. प्रशासकाचे काम ठोस नाही. लोकांना सुविधा देण्यापेक्षा नको त्याच गोष्टी पालिकेत चालल्या आहेत, असे आनंद चंदनशिवे यांनी सांगितले.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #municipal #authorities #interested #life #contractor #tone #displeasure #former #corporators #municipal #parallelwater #channel, #ठेकेदार #जीवावर #मनपा #अधिकारी #ऐश #माजी #नगरसेवक #नाराजी #सूर #महापालिका
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या ‘चिमणी’ बाबत नियोजन भवनात गोपनीय बैठक ?
Next Article Kolhapur कोल्हापुरात तणाव, इंटरनेट सेवा बंद, जमावबंदी आदेश लागू

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?