Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा उच्चांक; 534 नवीन बाधित तर 14 मृत्यू, मंगळवेढ्यात उपचाराअभावी मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा उच्चांक; 534 नवीन बाधित तर 14 मृत्यू, मंगळवेढ्यात उपचाराअभावी मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2020/09/06 at 10:38 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना दाखल झाल्यापासून एकाच दिवशी सर्वाधिक बाधित आढळण्याचा उच्चांक आज घडला आहे. महापालिका हद्दीत 72 तर ग्रामीण भागात 462 बाधित आढळल्याने आज जिल्ह्याच एकूण आकडेवारीत 534 बाधितांची भर पडली आहे. ग्रामीणमधील 13 तर महापालिका हद्दीतील 1 अशा एकूण 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सोलापूर जिल्ह्यात 500 पेक्षा अधिक बाधित एकाच दिवशी आढळण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. महापालिका हद्दीतील बाधितांची संख्या 7 हजार 32 तर ग्रामीण भागातील बाधितांची संख्या 13 हजार 672 झाल्याने बाधितांची एकूण संख्या 20 हजार 704 झाली आहे. महापालिका हद्दीतील 427 तर ग्रामीण भागातील 395 अशा एकूण 822 जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

कोरोना चाचणीचे 224 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामध्ये महापालिका हद्दीतील 99 तर ग्रामीण भागातील 125 अहवालांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील 9 हजार 294 तर महापालिका हद्दीतील 5 हजार 870 असे एकूण 15 हजार 164 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. रुग्णालयात सध्या 4 हजार 718 जणांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये महापालिका हद्दीतील 735 तर ग्रामीण भागातील 3 हजार 983 रुग्णांचा समावेश आहे.

* मंगळवेढ्यात उपचाराअभावी मृत्यू

मंगळवेढा तालुक्‍यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत तालुक्‍यातील गणेशवाडी येथील एका 40 वर्षीत व्यक्तीला त्रास होऊ लागल्यामुळे मंगळवेढा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथील डॉक्‍टरांनी त्यांना सोलापूर येथे उपचाराला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. परंतु बराच वेळ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे संबंधित व्यक्तीला खासगी वाहनाने उपचारासाठी सोलापूरला नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला.

जवळपास एक तास रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे तासाभराने खाजगी वाहनांचा आधार घेत त्या व्यक्तीला उपचारासाठी सोलापूरला नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या कोरोना चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आला.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सोलापूर #जिल्हा #कोरोना #उच्चांक #534नवीनरुग्ण #14मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरबरोबर मलायकालाही कोरोनाची लागण
Next Article केंद्राने शाळा उघडण्यास दिली परवानगी; प्रार्थना, खेळासह इतर कार्यक्रमांना ‘नो परमिशन’

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?