Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोना ब्रेकिंग ; या ठिकाणी जाण्यासाठी ई-पास बंधनकारक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

कोरोना ब्रेकिंग ; या ठिकाणी जाण्यासाठी ई-पास बंधनकारक

Surajya Digital
Last updated: 2021/03/09 at 9:48 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

चेन्नई : देशात पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात येत आहे. त्यातच आता ई-पासची अट पुन्हा लागू करण्यात आली आहे. तामिळनाडू सरकारने हा निर्णय घेतला. सर्व आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक प्रवाशांना ही अट लागू असेल. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पुदुच्चेरी वगळता इतर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतून येणाऱ्यांसाठी हा नियम बंधनकारक असेल. त्यामुळं देशातील या भागात जायच्या विचारात असाल, तर एकदा ई- पास नक्कीच काढा.

कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा नव्या रुग्णांची झपाट्यानं वाढ होई लागली असल्यामुळं आता संपूर्ण देशात पुन्हा एकदा सतर्कतेच्या दृष्टीनं काही महत्त्वाची पावलं उचलण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लावण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा ई- पासची अटही लागू करण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता हा निर्णय पुन्हा एकदा लागू करण्यात आला आहे. तामिळनाडू राज्य प्रशासनाकडून राज्यातील प्रवास नियमांमध्ये पुन्हा एकदा काही कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ज्याअंतर्गत आंतरराष्ट्रीय प्रवास करुन आलेल्या आणि स्थानिक प्रवास करणाऱ्यांनाही ही अट लागू असणार आहे.

कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केंद्रशासित पुदुच्चेरी येथून येणाऱ्यांसाठी मात्र हे नियम शिथील असणार आहेत. राज्य शासनाकडून राज्यात येणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या या ई- पासमुळं कोणीही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यास त्या व्यक्तीपासून सुरु झालेली संसर्ग साखळी ओळखत कोरोनाच्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यास मदत होणार आहे.

राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ई- पासची अट या महिन्याच्या सुरुवातीपासूनच लागू करण्यात आली आहे. सर्व आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक प्रवाशांना ही अट लागू असेल. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पुदुच्चेरी वगळता इतर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतून येणाऱ्यांसाठी हा नियम बंधनकारक असेल.

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #Coronabraking #E-pass #mandatory #visit #thisplace, #कोरोनाब्रेकिंग #याठिकाणी #जाण्यासाठी #ई-पासबंधनकारक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अयोध्येत बनणार श्रीरामांची जगातील सर्वांत उंच मूर्ती, मूर्तीकारांनी सोलापूर दौ-यात दिली माहिती
Next Article अमृता फडणवीसांचे नवे गाणे, रोहित पवारांकडून कौतुक

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?