Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: फ्रान्स, इंग्लंडमध्ये लॉकडाऊनची घोषणा; भारतातही दुसरा लॉकडाऊन होणार का? चर्चा सुरु
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

फ्रान्स, इंग्लंडमध्ये लॉकडाऊनची घोषणा; भारतातही दुसरा लॉकडाऊन होणार का? चर्चा सुरु

Surajya Digital
Last updated: 2020/11/02 at 3:26 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. कोरोनाची दुसरी लाट अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा लोकांचा बळी घेत आहे. जगभरात पुन्हा एकदा संक्रमण वाढू लागले आहे. त्यामुळेच फ्रान्स आणि आता इंग्लंडने देखील पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. ब्रिटेनमध्ये लॉकडाउन-2 ची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर आता भारतात देखील लॉकडाऊन होणार का, असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ लागला आहे.

ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी देशात दुसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 5 नोव्हेंबरपासून हा लॉकडाऊन सुरु होणार आहे. 2 डिसेंबरपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. जॉनसन यांनी लॉकडाऊन दरम्यान घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. 2 डिसेंबरनंतर परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. यूरोपमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने फ्रान्सने देखील गुरुवारी रात्रीपासून लॉकडाऊनची घोषणा केली होती.

भारतात देखील कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी इशारा दिला होता की, भारतात देखील कोरोनाची दुसरी लाट येत आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर न पडणं आणि बाहेर पडल्यानंतर मास्क लावणं महत्त्वाचं आहे. देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची वाढ होण्याची शक्यता आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

लोकांचा निष्काळजीपणा आणि प्रदूषण यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचं संक्रमण होण्याची चिन्ह आहेत. लोकांनी जर निष्काळजीपणा सोडला नाही तर येणाऱ्या काळात मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. पंतप्रधान मोदी यांनी देखील जोपर्यंत लस नाही तोपर्यंत निष्काळजीपणा नको असं आवाहन केलं आहे.

* भारतात कोरोनाचा आकडा 82 लाखांच्या उंबरठ्यावर

भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 46,964 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशात कोरोना संक्रमितांची संख्या 81,84,083 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 470 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यांचा आकडा 1,22,111 वर पोहोचला आहे. देशात अजूनही  कोरोनाचे 5,70,458 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत 74,91,513 जण बरे झाले आहेत. भारतात देखील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #भारतात #लॉकडाऊन2 #चर्चासुरु #फ्रान्स #इंग्लंड
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘प्रिसिजन गप्पां’ची यंदा ‘ऑनलाईन’ दिवाळी; यंदा तपपूर्ती, ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान प्रक्षेपण
Next Article रामविलास पासवान यांची हत्या? मुलगा चिराग पासवानवर संशय घेत चौकशीची मागणी

Latest News

‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
हिमाचल प्रदेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; ४४ प्रवासी जखमी
Top News July 1, 2025
रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी
देश - विदेश July 1, 2025
राजदंड उचलण्याचा प्रयत्न, नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित
Top News July 1, 2025
ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन
देश - विदेश July 1, 2025
पहलगाम हल्ला हा एक प्रकारचे आर्थिक युद्ध होते-  जयशंकर
Top News July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?