Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारतात कोरोनाने 47 लाख लोकांचा मृत्यू झाला, WHO चा वेगळाच दावा, भारताने घेतला आक्षेप
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

भारतात कोरोनाने 47 लाख लोकांचा मृत्यू झाला, WHO चा वेगळाच दावा, भारताने घेतला आक्षेप

Surajya Digital
Last updated: 2022/05/06 at 2:50 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

नवी दिल्ली : कोरोनाने भारतात 5 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वेगळाच दावा केला आहे. भारतात कोरोनामुळे एकुण 47 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे WHO ने म्हटले आहे. पण भारताने आक्षेप घेतला आहे. Corona kills 47 lakh people in India, WHO claims otherwise, India objects

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोना मृत्यूबाबत जारी केलेल्या अहवालावरून शंका उपस्थित करण्यात येतेय. यामध्ये एक आक्षेप खुद्द भारतानेच नोंदवला आहे. डब्ल्यूएचओने जाहीर केलेल्या आकडेवारीवर, विश्वास ठेवता येणार नाही, असं स्पष्ट म्हटले आहे. या अहवालावर भारत सरकारने आक्षेप घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटना चीनच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप अमेरिकेचा आहे. कोरोनाबाबत जागतिक आरोग्य संघटना जगाची दिशाभूल करत असल्याचेही अमेरिकेचे म्हणणे आहे.

डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रेयसस यांनी हा आकडा गंभीर असल्याचं म्हटलं आहे. यातून देशांनी धडा घ्यावा, असं त्यांनी म्हटलं आहे. भविष्यातील आरोग्याशी संबंधित आणीबाणीचा सामना करण्यासाठी देशांनी आरोग्य सेवांशी निगडीत क्षेत्रात अधिक गुंतवणूक करावी असा सल्ला त्यांनी दिला आहे.

जगभरात गेली दोन वर्ष कोरोनाने थैमान घातलं. कोरोना जगभरात करोडो लोकांचा मृत्यू झाला. आता जागतिक आरोग्य संघटनेने याचा अहवाल समोर आणला आहे. या अहवालाननुसार गेल्या दोन वर्षात जगभरात सुमारे 15 दशलक्ष लोकांनी कोरोनाव्हायरसमुळे किंवा आरोग्य प्रणालींवर झालेल्या परिणामांमुळे आपले प्राण गमावले आहेत. विविध देशांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीपेक्षा हा आकडा दुप्पट आहे. यापैकी बहुतेक मृत्यू दक्षिणपूर्व आशिया, युरोप आणि अमेरिकेत झाले आहेत. तर भारतात हा आकडा 47 लाख इतका आहे. अधिकृत आकडेवारीपेक्षा हा आकडा 10 पट जास्त आहे.

https://www.facebook.com/109399567404448/posts/535040444840356/

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

WHO ने काही तज्ज्ञांना कोरोना काळात झालेल्या मृत्यूच्या वास्तविक संख्येचं मूल्यांकन करण्याची जबाबदारी दिली होती. या तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार, 1.33 कोटी ते 1.66 कोटी लोकांचा मृत्यू एकतर कोरोना विषाणूमुळे झाला आहे किंवा या काळात आरोग्यसेवेच्या कमतरतेमुळे झाला आहे. ही आकडेवारी देशांनी दिलेल्या डेटावर आणि सांख्यिकीय मॉडेलिंगवर आधारित आहे. डब्ल्यूएचओने कोविड-19 मुळे झालेल्या मृत्यूचे तपशील थेट दिलेले नाहीत.

भारताने कोविड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूंचा अंदाज लावण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला भारत सरकारने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2020 मध्ये 4,74,806 अधिक मृत्यू झाल्याचे दिसून आले. भारताने २०२१ साठी मृत्यूचा अंदाज जाहीर केलेला नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाज सादर करण्यासाठी गणितीय मॉडेल्सच्या वापरावर भारताने जोरदार आक्षेप घेतला. मॉडेल्सची वैधता आणि डेटा संकलनाची पद्धत संशयास्पद असल्याचं भारताने म्हटलं आहे. भारताने म्हटलं आहे की डब्ल्यूएचओने अतिरिक्त मृत्यूचे अंदाज जारी केले आहेत. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार कोविडमुळे किंवा आरोग्य सेवांवर त्याचा परिणाम झाल्यामुळे भारतात 47 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

डॉ. गुलेरिया यांनी तीन मोठी कारणं दिली आहेत, ज्यामुळे WHO अहवालावर विश्वास ठेवता येत नाही. त्यांचं म्हणणं आहे की, भारतात जन्म-मृत्यू डेटा रेकॉर्ड करण्याचा एक पद्धतशीर मार्ग आहे, ज्यामध्ये कोविड वगळता सर्व प्रकारचे मृत्यू रेकॉर्ड केले जातात. तर हा डेटा जागतिक आरोग्य संघटनेने वापरलेला नसल्याचे म्हटले आहे.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/534911714853229/

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Corona #kills #47lakh #people #India #WHO #claims #India #objects, #भारत #कोरोना #47लाख #लोक #मृत्यू #डब्ल्यूएचओ #दावा #भारत #आक्षेप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article college girl killed सोलापूर : कंटेनरची दुचाकीस धडक, कॉलेजयीन तरूणी जागीच ठार
Next Article कंटेनर – रिक्षाच्या धडकेत सातजणांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?