मुंबई / नवीदिल्ली : राज्यामध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अनेक गोष्टींवर निर्बंध टाकण्यात आले आहेत. अशातच भारतीय रेल्वेने 18 प्रवासी गाड्या उद्या म्हणजे 27 एप्रिलपासून 10 मे पर्यंत रद्द केल्या आहेत. प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे या गाड्या रद्द करत असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या गाड्या कोरोनामुळे नव्हे तर रेल्वे तोट्याच्या पटरीवरुन चालल्याने हा निर्णय घेतला आहे.
https://twitter.com/BhagalpurRail/status/1386390564698935298?s=20
मात्र गाड्या तोट्यात चालत असल्याने रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. या गाड्यांना लोकांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे वृत्त आहे. रद्द करण्यात आलेल्या गाड्यामध्ये मनमाड -मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, अजनी- मुंबई हमसफर/ दुरंतो एक्स्प्रेस, नागपूर – पुणे, दादर -शिर्डी साईनगर एक्स्प्रेस अन्य गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांमध्ये बहुतेक गाड्या पुणे व मुंबईतून धावणाऱ्या आहेत. तसेच नागपूर, लातूर, सोलापूर, कोल्हापूर या गाड्यांचाही त्यात समावेश आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1386986830352949248?s=20
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
1) 02109/02110 मुंबई -मनमाड- मुंबई विशेष – ता. 27 एप्रिल ते 10 मे
2) 02015/02016 मुंबई – पुणे- मुंबई विशेष- ता. 27 एप्रिल ते 10 मे
3) 02113 पुणे- नागपूर त्रि-साप्ताहिक विशेष – ता. 28 एप्रिल ते 10 मे
4) 02114 नागपूर – पुणे त्रि-साप्ताहिक विशेष – ता. 27 एप्रिल ते 9 मे
5) 02189 मुंबई- नागपूर विशेष – ता. 28 एप्रिल ते 11 मे
6) 02190 नागपूर- मुंबई विशेष – ता. 27 एप्रिल ते 10 मे
7) 02207 मुंबई – लातूर विशेष आठवड्यातील चार दिवस – ता. 27 एप्रिल ते 10 मे
8) 02208 लातूर – मुंबई आठवड्यातील चार दिवस विशेष – ता. 28 एप्रिल ते 11 मे
9) 02115 मुंबई – सोलापूर विशेष – ता. 28 एप्रिल ते 11 मे
https://twitter.com/SurajyaDigital/status/1386979607958544384?s=20
10) 02116 सोलापूर – मुंबई विशेष – ता. 27 एप्रिल ते 10 मे
11) 01411 मुंबई- कोल्हापूर विशेष – ता. 28 एप्रिल ते 11 मे
12) 01412 कोल्हापूर-मुंबई विशेष – ता. 27 एप्रिल ते 10 मे
13) 02111 मुंबई-अमरावती विशेष – ता. 28 एप्रिल ते 11 मे
14) 02112 अमरावती-मुंबई विशेष – ता. 27 एप्रिल ते 10 मे
15) 02271 मुंबई-जालना विशेष – ता. 27 एप्रिल ते 10 मे
16) 02272 जालना-मुंबई विशेष दि. 28.4.2021ते दि. 11.5.2021 पर्यंत
17) 02043 मुंबई-बिदर त्रि-साप्ताहिक विशेष – ता. 28 एप्रिल ते 8 मे
18) 02044 बिदर-मुंबई त्रि-साप्ताहिक विशेष – ता. 29 एप्रिल ते 9 मे
https://twitter.com/SurajyaDigital/status/1386881430169423873?s=20