Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आता घरीच करा कोरोना टेस्ट, पुण्यातील होम टेस्टिंग किटला मंजुरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

आता घरीच करा कोरोना टेस्ट, पुण्यातील होम टेस्टिंग किटला मंजुरी

Surajya Digital
Last updated: 2021/05/20 at 10:44 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई / पुणे : आता घरीच कोरोना टेस्ट करता येणार आहे. आयसीएमआरने यासाठी कोरोना रॅपीड अँटीजन टेस्टला परवानगी दिली आहे. यासाठी पुण्यातील Mylab Discovery Solutions ने CoviSelf ही कीट तयार केली आहे. हे टेस्ट किट एका आठवड्यात बाजारात उपलब्ध होईल.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1395396984622616579?s=19

कोरोनाची लक्षणे आणि कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांना घरीच नाकातून स्टॅबचा नमुना घेऊन टेस्ट करता येऊ शकते. लवकरच ही किट मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकते. टेस्ट कशी करायची, यासाठीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

https://twitter.com/MylabSolutions/status/1395238298126192641?s=20

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) घरात कोरोना व्हायरस टेस्टिंग करण्यासाठी कोविसेल्फ किटला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे आता कोणालाही अवघ्या 250 रुपयात घरच्या घरी रॅपिड अँटिजन टेस्ट किट (RAT) आणून कोव्हिड चाचणी करता येईल. विशेष म्हणजे फक्त 15 मिनिटात कोरोना चाचणीचा अहवाल हाती येणार आहे. ICMR ने मात्र विनाकारण चाचणी न करण्याचा सल्ला दिला आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1395327525035724802?s=19

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन लिमिटेड कंपनीने घरच्या घरी रॅपिड अँटिजन टेस्ट किट तयार केलं आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणं दिसत आहेत किंवा ज्या व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आली आहेत, त्यांनीच या किटचा वापर करावा, असा सल्ला या कंपनीने दिला आहे. RAT चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना कोरोनाबाधित म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. त्यांची पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही. तर लक्षणं असूनही (सिम्पटमॅटिक) ज्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असेल, त्यांना कोरोना संशयित मानलं जाईल. ते स्वतःची आरटी-पीसीआर टेस्ट करु शकतात.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1395347908925411333?s=19

टेस्ट पॉझिटिव्ह येण्यासाठी 5 से 7 मिनिटांची वेळ लागेल, तर निगेटिव्ह येण्यासाठी जास्तीत जास्त 15 मिनिटांचा वेळ लागेल. टेस्ट किटच्या पाऊचमध्ये आधीच भरलेली एक्स्ट्रॅक्शन ट्यूब, नेझल स्वॅब, एक टेस्ट कार्ड आणि सेफ्टी बॅग असेल. याशिवाय टेस्ट करणाऱ्या व्यक्तीला आपल्या फोनमध्ये मायलॅब कोविसेल्फ अॅप डाऊनलोड करावे लागेल. कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या सर्व व्यक्तींना होम आयसोलेशन, ICMR आणि आरोग्य मंत्रालयाच्या नियमांचं पालन करुन काळजी घ्यावी लागेल.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1395359416447234051?s=19

* याचा कसा वापर करायचा, वाचा

मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन लिमिटेड कंपनीच्या युजर मॅन्युअलनुसार नेझल स्वॅब दोन्ही नाकपुड्यांमध्ये 2 से 4 सेमी आतपर्यंत टाकावे. त्यानंतर नेझल स्वॅब दोन्ही नाकपुड्यांत पाच वेळा फिरवावे. स्वॅब आधीपासून भरलेल्या ट्यूबमध्ये टाकावा आणि उरलेला स्वॅब तोडून टाकावा. ट्यूबचे झाकण बंद करावे. टेस्ट कार्डवर ट्यूब दाबून एकामागून एक दोन थेंब टाकावेत. चाचणी अहवालासाठी 15 मिनिटं वाट पाहावी. 20 मिनिटांनंतर येणारा निकाल अवैध मानला जाईल. टेस्ट कार्डवर दोन सेक्शन असतील. एक कंट्रोल, तर दुसरा टेस्ट सेक्शन. जर बार केवळ कंट्रोल सेक्शन ‘C’वर असेल, तर कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे. जर बार कंट्रोल सेक्शन ‘C’ आणि सेक्शन ‘T’ या दोन्हीवर असेल, तर अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1395374832901001220?s=19

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

TAGGED: #CoronaTest #athome #Home #Testing #Kit #approved #Pune, #घरीचकरा #कोरोनाटेस्ट #पुण्यातील #होमटेस्टिंग #किटला #मंजुरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणारच; ऑनलाइन की ऑफलाइन ?
Next Article पूर्व विभाग सिनेमा , पद्माचे किस्से

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?