Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यातील पहिलीच कारवाई; ठाण्यातील खासगी रुग्णालयाची नोंदणी रद्द
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

राज्यातील पहिलीच कारवाई; ठाण्यातील खासगी रुग्णालयाची नोंदणी रद्द

Surajya Digital
Last updated: 2020/07/26 at 11:14 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

ठाणे : मुंबई महानगर क्षेत्रात काही खासगी कोविड रुग्णालये वाढीव दराने शुल्क आकारणी करीत असल्याच्या तक्रारी वाढत असताना ठाणे महापालिकेने अशाच तक्रारींवरून घोडबंदर भागातील ‘होरायझन प्राइम’ या खासगी रुग्णालयाची नोंदणी रद्द केली.

होरायझन प्राइम रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने रुग्णांना गैरवाजवी देयके आकारून वसुली केल्याची बाब महापालिकेने नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या प्राथमिक अहवालात उघड झाली आहे. वाढीव देयकांप्रकरणी कोविड रुग्णालयावर कारवाई झाल्याचे हे राज्यातील पहिलेच प्रकरण आहे. मुख्य लेखा परीक्षकांनी रुग्णालय व्यवस्थापनाला २० जुलै रोजी नोटीस बजावून याबाबत दोन दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते.  रुग्णालयाने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे ही कारवाई केली आहे.

(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)

हे रुग्णालय तसेच शहरातील इतर खासगी कोविड रुग्णालयांमधूनही वाढीव बिलांची आकारणी केली जात आहे, अशा तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्य लेखा परीक्षक आणि ठाण्याचे उपजिल्हाधिकारी यांच्या संनियंत्रणात आयुक्तांनी विशेष लेखा परीक्षक पथक तयार केले होते. या पथकाने ‘होरायझन प्राइम’मधील  देयकांची चौकशी केली.  या रुग्णालयाने २ एप्रिल ते १२ जुलै या कालावधीत एकूण ७९७ रुग्णांवर उपचार केले. त्यापैकी ५७ देयके लेखा परीक्षणासाठी पथकाकडे सादर करण्यात आली होती. ५६ देयके गैरवाजवी दराने आकारण्यात आल्याची बाब पथकाच्या निदर्शनास आली होती. या देयकांची आक्षेपार्ह रक्कम सहा लाख आठ हजार ९०० रुपये इतकी आहे.

* एक महिन्यासाठी नोंदणी रद्द

या रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतला असून कोविड रुग्णालयाचा दर्जा कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील पहिले खासगी कोविड रुग्णालय म्हणून ‘होरायझन प्राइम’ रुग्णालयास मार्चमध्ये परवानगी देण्यात आली होती.

* रुग्ण दाखल करण्यास मनाई

होरायझन प्राईममध्ये दाखल असलेल्या रुग्णांवर आयसीएमआर आणि शासन आदेशानुसार औषधोपचार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडून शासकीय दरानुसार शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय, हे रुग्ण बरे होऊन घरी जाईपर्यंत द्विसदस्यीय पथक पूर्णवेळ तैनात करण्यात येणार आहे. या रुग्णालयात आता एकही नवीन रुग्ण उपचारासाठी दाखल करून घेतला जाणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

TAGGED: #कोरोना #होरायझनप्राइम #ठाणे #नोंदणीरद्द
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विद्यार्थ्यांना कोरोना काळात मोठा दिलासा; अभ्यासक्रमात २५ टक्‍के कपात करण्याचा निर्णय
Next Article “माझ्या विरोधात एक गँग काम करतीय पण नशिबावर माझा विश्वास”

Latest News

इराणच्या शिया धर्मगुरूंकडून ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्याविरुद्ध फतवा जारी
देश - विदेश June 30, 2025
मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?