सोलापूर : आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत शिक्षकांना शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करणे बंधनकारक आहे. महापालिका आयुक्तांनी आदेश देऊनही ड्यूटीवर हजर न राहणाऱ्या 37 शिक्षकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यातील 15 शिक्षक आता रुजू झाले असून उर्वरित शिक्षकांनी अजूनही ड्यूटी जॉईन केली नाही. त्यामुळे त्यांना वेतन देऊ नये, असे आदेश आता महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून काढले जात आहेत.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1394150016327974914?s=20
कोरोनाची लाट आटोक्यात यावी या हेतूने शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे केला जात आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार शिक्षकांची मदत घेतली जात आहे. शहरात एकाचवेळी एक हजार 50 शिक्षक प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करीत आहेत. सर्व्हेसाठी प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या जवळपास अडीच हजार शिक्षकांची मदत घेतली जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनाचा सर्व्हे करताना 50 ते 55 वर्षांवरील शिक्षक, को-मॉर्बिड शिक्षकांसह दिव्यांग, 20 व 40 टक्क्यांवरील शिक्षक, शिक्षणसेवक, गर्भवती महिला शिक्षिकांना कोरोना ड्यूटीतून सवलत देण्यात आली आहे.
कोरोना सर्व्हे अथवा कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम करताना मयत झालेल्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास शासनाकडून 50 लाखांचे विमा कवच दिले जात आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव 30 जूनपर्यंत पाठवावा लागणार असून, त्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1394127087682809856?s=20
* 32 शिक्षकांना बाधा, तीन मृत्यू, मदतीचा प्रस्ताव एकाच नाही
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना घरोघरी जाऊन सर्व्हे करणारे 32 शिक्षक कोरोनाबाधित झाले (30 मार्च 2021 पासून) असून त्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. मात्र, ड्यूटीवर हजर न राहणाऱ्या शिक्षकांचे वेतन थांबविण्याचे आदेश देणाऱ्या महापालिका प्रशासनाने मयत शिक्षकांच्या मदतीचा प्रस्ताव अजूनही पाठविलेला नाही. दरम्यान, प्रस्ताव पाठविण्याची मुदत शासनाने 30 जूनपर्यंत वाढविल्याने आता त्यांचा मदतीचा प्रस्ताव पाठविण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1393959112640135176?s=20
* अधिकारी काय म्हणतायत ?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे केला जात आहे. 30 मार्चपासून आतापर्यंत जवळपास 30 शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील दोन शिक्षक व एका लिपिकाचा मृत्यू झाला आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत मिळावी म्हणून प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे कादर शेख (प्रशासनाधिकारी, सोलापूर महापालिका) यांनी सांगितले.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1393931792852275200?s=20