Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एसटी संप; एसटी महामंडळाकडून 1225 खासगी चालकांची नियुक्ती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

एसटी संप; एसटी महामंडळाकडून 1225 खासगी चालकांची नियुक्ती

Surajya Digital
Last updated: 2022/02/16 at 3:32 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

मुंबई : एसटी संपामुळे बससेवा खोळंबली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने 1225 खासगी चालकांची नियुक्ती केली आहे. एसटी संपापूर्वी राज्यात 94 हजारांहून अधिक एसटी फेऱ्या सुरू होत्या. मात्र संपामुळे सध्या 9 हजार 626 फेऱ्या सुरू आहेत. तसेच या खासगी चालकांच्या मदतीने राज्यात 9 हजार फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आणखी खासगी चालकांची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती एसटी महामंडळाच्या जनसंपर्क विभागाने दिली.

महामंडळाच्या जनसंपर्क विभागाने सांगितलं की, ‘परीक्षाकाळात विद्यार्थी वाहतूक सुरळीत राहावी तसेच, कोरोना नियंत्रणात आल्याने राज्यातील नागरिकांची प्रवासासाठी वाढलेली मागणी पाहता महामंडळात खासगी चालकांची नियुक्ती केली जातेय. जानेवारीमध्ये खासगी चालकांच्या नियुक्तीसाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार नियुक्ती प्रक्रिया सुरू करून 1225 खासगी चालकांची नियुक्ती केली गेलीय. त्याचबरोबर वाहतुकीची गरज लक्षात घेऊन त्याचा आढावा घेतल्यानंतर आणखी खासगी चालकांची नियुक्ती करण्यात येईल.’

वाहतूक सेवा पुर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाकडून 1225 खासगी चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासगी चालकाच्या मदतीने महाराष्ट्रभर नऊ हजार एसटी फेऱ्या सुरू केल्याचा दावा महामंडळाने केलाय. दरम्यान आगामी काही दिवसामध्ये आणखी काही अशा चालकांची नियुक्ती करणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. ST Strike; ST Corporation appoints 1225 private drivers

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

महामंडळाच्या जनसंपर्क विभागाने सांगितलं की, ‘परीक्षाकाळात विद्यार्थी वाहतूक सुरळीत राहावी तसेच, कोरोना नियंत्रणात आल्याने राज्यातील नागरिकांची प्रवासासाठी वाढलेली मागणी पाहता महामंडळात खासगी चालकांची नियुक्ती केली जातेय.

जानेवारीमध्ये खासगी चालकांच्या नियुक्तीसाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार नियुक्ती प्रक्रिया सुरू करून 1225 खासगी चालकांची नियुक्ती केली गेलीय. त्याचबरोबर वाहतुकीची गरज लक्षात घेऊन त्याचा आढावा घेतल्यानंतर आणखी खासगी चालकांची नियुक्ती करण्यात येईल. दरम्यान, ‘एसटी संपापूर्वी राज्यात 94 हजारांहून अधिक एसटी फेऱ्या सुरू होत्या.

मात्र संपामुळे सध्या 9 हजार 636 फेऱ्या सुरू आहेत. त्याचबरोबर 249 आगार अंशत: सुरू करण्यात आले आहेत. असं एसटी महामंडळाने सांगितलं आहे. दरम्यान, विलिनीकरणाच्या मागणीवर निर्णय होईपर्यंत कर्मचारी संपावर ठाम आहेत. 64,296 कर्मचारी संपावर ठाम असल्याने राज्यातील एसटी वाहतुकीला फटका बसला आहे. तर, 27,980 कर्मचारी संपातून माघारी येत पुन्हा कामावर रुजूही झाले आहेत.

You Might Also Like

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल

पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद

पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या – खासदार मेधा कुलकर्णीं

लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ५ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्सची प्रकृती बिघडली

TAGGED: #ST #Strike #Corporation #appoints #private #drivers, #एसटी #संप #महामंडळ #खासगी #चालक #नियुक्ती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बॉलिवूडचा गोल्डमॅन हरपला, बप्पी लहरीचं मुंबईत निधन
Next Article 28 बँकांना चुना : एबीजी शिपयार्ड बँक घोटाळा, लुकआऊट नोटीस जारी

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?